ETV Bharat / bharat

नो टू सिंगल युज प्लास्टिक: 'तो' करतोय प्लास्टिकपासून टी-शर्ट! - प्लास्टिकपासून टी-शर्ट

सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घालण्यासाठी देशभर विविध अभियान चालवले जात आहेत. ईटीव्ही भारतसुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी होत आहे. 'नो प्लास्टिक, लाईफ फंटॅस्टिक' या सदराखाली आजचा हा दहावी विशेष स्टोरी...

प्लास्टिकपासून टी-शर्ट
प्लास्टिकपासून टी-शर्ट
author img

By

Published : Dec 21, 2019, 7:06 PM IST

रायपूर - टी-शर्ट हा प्रकार सर्वच वयोगटातील लोक आवडीने वापरतात. घालण्यासाठी आणि धुण्यासाठी सोपा म्हणून टी-शर्टकडे पाहिले जाते. आपण घालत असलेला टी-शर्ट हा प्लास्टिकपासून बनवलेला असेल तर..? प्लास्टिकपासून टी-शर्टही बनू शकतो ही गोष्ट कठीण आहे मात्र, अशक्य नक्कीच नाही. रायपूर मधील एका तरुणाने सिंगल युज प्लास्टिकपासून टी-शर्ट तयार करण्याची युक्ती शोधून काढली आहे. अधीश ठाकूर असे या तरुणाचे नाव आहे.

प्लास्टिकपासून टी-शर्ट

अधीश ठाकूरने सिंगल युज प्लास्टिकचा वापर करून स्वत:चा स्टार्ट-अप सुरू केला आहे. वापरलेल्या 8 ते 10 प्लास्टिक बाटल्यांपासून अधीश एक टी-शर्ट तयार करतो. विशेष म्हणजे तयार केलेल्या प्रत्येक टी-शर्टच्या बाहीवर लिहिलेले असते, की हा टी-शर्ट प्लास्टिकपासून तयार केलेला आहे. तरीही अनिश यांच्या या उपक्रमाला लोकांची पसंती मिळत आहे. या माध्यमातून प्लास्टिक समस्येवर मात करता येऊ शकते.

हेही वाचा - नो टू सिंगल यूज प्लास्टिक : प्लास्टिक कचरा द्या आणि पोटभर जेवण करा

तयार करण्यात आलेले टी-शर्ट हे सामान्य टी-शर्टप्रमाणेच विविध रंगामध्ये आहेत. टी-शर्टची निर्मिती चेन्नईतील इरोड आणि तिरुप्पूर येथे केली जाते. संशोधन केल्यानंतर लक्षात आले की, प्लास्टिकचा वापर करून टी-शर्टची निर्मिती करता येऊ शकते. त्यानंतर कपडा उत्पादकांशी चर्चा करून टी-शर्टची निर्मितीला सुरुवात करण्यात आली. नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनाही हा उपक्रम दाखवण्यात आला असून, त्यांनी याची प्रशंसा केली आहे, अशी माहिती अधीश ठाकूर यांनी दिली.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.