ETV Bharat / bharat

मध्यप्रदेश: रेल्वे टँकरमधून LPG वायू गळती...मोठी दुर्घटना टळली - railway tanker LPG gas leak mp

कर्नाटकहून मालवाहू रेल्वे भोपाळजवळील बकानिया एलपीजी गॅस डेपो येथे चालली होती. दुपारी साडेचारच्या सुमारास रेल्वे खांडवा स्टेशनवर थांबली. त्यावेळी गाडीच्या एका डब्यातून गॅस गळती होत असल्याचे समोर आले.

railway tanker LPG gas leak
रेल्वे गॅस गळती
author img

By

Published : May 9, 2020, 3:24 PM IST

Updated : May 9, 2020, 6:56 PM IST

भोपाळ - विशाखापट्टनम येथील कारखान्यातील वायू गळती ताजी असतानाच काल (शुक्रवार) मध्यप्रदेशात वायू गळतीची घटना समोर आली आहे. मात्र, रल्वे विभागाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. रेल्वेच्या ३२ टँकरमधून (LPG) एलपीजी गॅस कर्नाटकाहून भोपाळला आणण्यात येत होता. मात्र, खंडवा शहराजवळ वायू गळती समोर आल्याने अनर्थ टळला. एका टँकरमध्ये सुमारे ४० टन गॅस भरलेला होता. वायूगळतीनंतर जर काही दूर्घटना झाली असती तर खंडवा शहरात हाहाकार माजला असता.

रेल्वे टँकरमधून LPG वायू गळती

कर्नाटकहून मालवाहू रेल्वे भोपाळ जवळील बकानिया एलपीजी गॅस डेपो येथे चालली होती. शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास रेल्वे खंडवा स्टेशनवर थांबली. त्यावेळी गाडीच्या एका टँकरमधून गॅस गळती होत असल्याचे समोर आले. काल सायंकाळी पाच वाजल्यापासून पुढील सात तास एका टँकरच्या स्लायडरमधून गॅस गळती होत होती.

ही बाब वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांच्या कानावर घालण्यात आल्यानंतर तत्काळ इतर सर्व इलेक्ट्रिक लाईन बंद करण्यात आल्या. कोणतेही घर्षण होऊन आग लागू नये म्हणून ट्रेन जागेवरच थांबविण्यात आली. सर्व आवश्यक ती काळजी घेण्यात आली.

सुमारे ४० टन गॅसचे ३२ टँकर

पीथमपूर येथून रेल्वे विभागाचे तज्ज्ञ पथक आले. तसेच आग्निशामक दलालाही पाचारण करण्यात आले होते. रात्री एक वाजेच्या दरम्यान गॅस गळती थांबविण्यात यश आले. त्यानंतर रेल्वे पुढील प्रवासाठी रवाना झाली. या मालवाहू गाडीत सुमारे ४० टन गॅसचे ३२ टँकर होते. जर वायूगळतीने आग लागली असती तर मोठा अनर्थ झाला असता. मात्र, सतर्कतेमुळे ही घटना टळली.

Last Updated : May 9, 2020, 6:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.