वलसाड (गुजरात) - गुंदलाव जीआयडीसीतील प्लास्टिकचे दाणे बनविणाऱ्या कंपनीत आज भीषण आग लागली. आगीची तीव्रता जास्त असल्याने धुराचे लोट आणि आगीच्या उंच ज्वाला उसळल्या होत्या. अग्निशमन दलाने घटनास्थळी येऊन आग विझवली. या घटनेत जीवितहानी झालेली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.
वलसाडच्या गुंदलावमध्ये धमडाची पीरू फळिया येथील जेपी एंटरप्राइस नावाच्या प्लास्टिकचे दाणे बनवणाऱ्या कंपनीत अचानक आग लागली. कंपनीत काम करणारे कामगार प्रसंगावधान राखून बाहेर पडल्याने दुर्घटना टळली. दिवाळीमुळे बरेच कामगार सुट्टीवर होते.
आगीचे कारण अस्पष्ट -
धमडाची पिरू फळिया येथील या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अचानक लागलेल्या या आगीने भीषण रुप धारण केले. कंपनीतील साहित्य प्लास्टिकचे असल्याने आग पसरली.
हेही वाचा -सीमेवर तैनात सुरक्षा दलाच्या जवानांची उत्साहात दिवाळी
अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी -
गुंदलाव जीआयडीसीतील प्लास्टिकचे दाणे बनविणाऱ्या कंपनीतील आग विझवण्यासाठी परिसरातील नागरिकांनी वलसाड नगरपालिकेशी संपर्क साधला. पालिकेच्या अग्निशमन विभागाकडून ४ गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. प्रचंड मेहनतीनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन कर्मचाऱ्यांना यश आले.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज -
ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असू शकते, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. याप्रकरणाची चौकशी केल्यानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातारवण पसरले होते.
हेही वाचा - जैसलमेरमधील जवानांसोबत पंतप्रधान मोदींची दिवाळी; म्हणाले सैनिक आहेत म्हणून देशात सण-उत्सव होतात