ETV Bharat / bharat

गुजरातमधील केमिकल कंपन्यांमध्ये भीषण स्फोट; अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात.. - Ahemadabad Chemical company fire

आज पहाटे वाटवा येथील दोन कंपन्यांमध्ये मोठे स्फोट झाले, ज्यानंतर आग लागली. हे स्फोट एवढे मोठे होता, की सुमारे पाच किलोमीटर पर्यंतच्या परिसरात यांचा आवाज ऐकू गेला. अद्याप या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आले नाही.

Major Fire Broke out At Chemical Company in Vatva GIDC, Ahmedabad
गुजरातमधील केमिकल कंपनीला भीषण आग; ४० बंब घटनास्थळी दाखल..
author img

By

Published : Dec 9, 2020, 6:41 AM IST

Updated : Dec 9, 2020, 7:53 AM IST

गांधीनगर : गुजरातच्या अहमदाबादमधील वाटवा जीआयडीसी परिसरात असलेल्या दोन केमिकल कंपन्यांमध्ये आज पहाटे मोठे स्फोट झाले. यानंतर कंपन्यांच्या इमारतींना भीषण आग लागली, ज्याची माहिती मिळताच अग्नीशामक दलाचे ४० बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सध्या सुमारे १०० कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी अथक परिश्रमाने ही आग आटोक्यात आणली. सध्या याठिकाणी कूलिंगचे काम सुरू आहे.

मीथोमील स्फोट..

मीथोमील नावाच्या केमिकलचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोन कंपन्यांमध्ये सुमारे आठ स्फोट झाले होते. हे स्फोट एवढे मोठे होते, की सुमारे पाच किलोमीटर पर्यंतच्या परिसरात यांचा आवाज ऐकू गेला. विझोल आणि वाटवा परिसरातील लोक या आवाजाने जागे झाले, आणि आगीची माहिती मिळताच सर्वांनी कंपनीच्या इमारतीकडे धाव घेतली.

गुजरातमधील केमिकल कंपनीला भीषण आग; ४० बंब घटनास्थळी दाखल..

बाजूच्या पाच कंपन्यांना आग..

या केमिकल फॅक्टरींमध्ये लागलेली आग हळूहळू बाजूच्या पाच कंपन्यांमध्येही पसरली होती. त्यामुळे यात अधिक नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जीवितहानी नाही..

अद्याप या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आले नाही. तसेच, कोणी जखमी असल्याचेही समोर आले नसून, खबरदारी म्हणून घटनास्थळी चार रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या.

हेही वाचा : सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये आज होणारी बैठक रद्द, शहांचा प्रयत्न असफल

Last Updated : Dec 9, 2020, 7:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.