ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मिरच्या शोफियान जिल्ह्यात 4 दहशतवाद्यांना मारण्यात लष्कराला यश

जम्मू आणि काश्मिर राज्यातील शोफियान जिल्ह्यामध्ये दशहतवादी आणि जवानांमध्ये आज (शनिवारी) सकाळी चकमक झाली. तेथील अमशिपोरा भागामध्ये एन्काऊंटरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मिर पोलिसांच्या संयुक्त पथकाला यश आले आहे.

jammu and kashmir
जम्मू-काश्मिरच्या शोफियन जिल्ह्यात 4 दहशतवाद्यांना मारण्यात लष्कराला यश
author img

By

Published : Jul 18, 2020, 8:01 AM IST

जम्मू आणि काश्मिर - राज्यातील शोफियान जिल्ह्यामध्ये दशहतवादी आणि जवानांमध्ये आज (शनिवारी) सकाळी चकमक झाली. तेथील अमशिपोरा भागामध्ये एन्काऊंटरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मिर पोलिसांच्या संयुक्त पथकाला यश आले आहे. ही माहिती संरक्षण खात्याच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली. अजूनही कारवाई सुरू असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

शुक्रवारी सकाळी 3 दहशतवादी ठार -

जम्मूच्या नागनाड-चिमर भागात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जम्मू-काश्मिर पोलिसांना यश आले आहे. शुक्रवारी सकाळी काश्मिरमधील कुलगाम आणि जम्मूच्या चिमर भागात दहशतवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मोहीम आखून दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात आली. याआधी 13 जुलैला अनंतनाग जिल्ह्यात दोन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला होता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.