भुवनेश्वर - ओडिसामध्ये एक असे मंदिर आहे, ज्यात कोणा देवाची नव्हे, तर आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधींची पूजा केली जाते.
ओडिसा राज्याच्या पश्चिमी भागात असलेले हे मंदिर, सर्व जाती, धर्म आणि पंथांच्याही वरच्या दर्जाचे आहे. कारण, या मंदिरामध्ये कोणीही प्रवेश करु शकते. एवढेच काय, तर या मंदिरात कोणत्याही जाती-धर्माची व्यक्ती पुजारी म्हणून काम करु शकते.
१९७४ मध्ये या मंदिराची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत हे मंदिर धर्मनिरपेक्षता आणि बंधुतेचा प्रसार करत आहे.