ETV Bharat / bharat

'महात्मा गांधीनीं धार्मिक सहिष्णुतेशी कधीही तडजोड केली नाही'

महात्मा गांधींचे धार्मिक सहिष्णुतेवरील विचार. खासकरुन मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माबद्दल त्यांनी जास्त ऐकलं होतं. मद्यपान आणि मांसाहारामुळे ख्रिश्चन धर्माबद्दल त्यांची मते थोडी वेगळी होती. ख्रिश्चन धर्मातील लोक हिंदू देव देवतांना नावे ठेवत असल्याचही त्यांनी ऐकलं होतं.

महात्मा गांधी
author img

By

Published : Aug 18, 2019, 11:49 AM IST

Updated : Aug 18, 2019, 4:10 PM IST

नवी दिल्ली - महात्मा गांधी त्यांच्या बैठकीची सुरुवात सर्वधर्म प्रार्थना म्हणून करायचे. या प्रार्थनेमध्ये सर्व धर्मांमंधील तत्वे समावलेली होती. धार्मिक सहिष्णुतेवर गांधीजींची गाढ श्रद्धा होती. तसेच अनेक धर्मांबद्दल गांधींनी त्यांच्या वडिलांकडूनही एकलेलं होतं. खासकरुन मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माबद्दल त्यांनी जास्त ऐकलं होतं. मद्यपान आणि मांसाहारामुळे ख्रिश्चन धर्माबद्दल त्यांची मते थोडी वेगळी होती. ख्रिश्चन धर्मातील लोक हिंदू देव देवतांना नावे ठेवत असल्याचही त्यांनी ऐकलं होतं.

मात्र, गांधीजी जेव्हा इंग्लडला गेले तेथे त्यांना असा एक ब्रिटीश व्यक्ती भेटला. जो शाकाहारी होता आणि मद्यपानही करत नव्हता. या ब्रिटीश व्यक्तीने त्यांना बायबल वाचायला दिलं. त्यातील 'न्यु टेस्टामेंट' हा धडा वाचून गांधी अतिशय प्रभावित झाले. कोणी तुमच्या एका गालावर चापट मारली तर तुम्ही दुसराही गाल पुढं करायला हवा, हे त्यांनी सर्वप्रथम त्यातच वाचलं. वाईट विचारांना चांगल्या विचारानेच जिकंता येतं, असे गांधीजी मानत असत. लहानपणापासूनच सत्यासंबधीचे विचार माझ्या मनात येत तर नाही ना? असेही गांधींना कधीकधी वाटे.

प्रत्येक धर्माला समानतेच्या भावनेनं पाहिलं पाहिजे, असं गांधीजी मानायचे. त्यामुळेच तर लहानपणापासून धार्मिक एकात्मता त्यांच्या मनामध्ये रुजली होती. मनुस्मृती वाचल्यानंतर गांधीजी नास्तिकतेच्या आणखी जवळ गेले. कारण मनुस्मृतीमध्ये मांसाहाराला प्रोत्साहन दिले होते. वेगवेगळे धर्म ग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आल की, सगळे धर्म जगाच्या नियमांवर आधारलेले आहेत, आणि हे नियम शेवटी सत्याशी एकरुप होतात. लहानपणापासूनच सत्याची साथ त्यांच्या जीवनाचं अभिन्न अंग बनले होते. पुढे तेच त्यांच्या जीवनाचा आधार बनला. त्यांच्या प्रत्येक कामामधून सत्याची बाजू दिसून येते.

भारताच्या फाळणीसाठी गांधींना दोषी धरलं जात, हे फारच चुकीच आहे. वीर सावरकर आणि इक्बाल सारख्या व्यक्तींनी द्विराष्ट्र सिद्धांताला खतपाणी घातल होतं. मात्र, तरीही धर्मांध आणि कट्टर विचाराचे लोक गांधींना फाळणीसाठी जबाबदार धरतात. तस पाहिलं तर भारताच्या फाळणीचा निर्णय मांऊटबॅटन, नेहरु, पटेल आणि जिनांनी घेतला होता. फाळणीच्या निर्णयापासून गांधीना वेगळं ठेवण्यात आल होत. फाळणी करण्याचा निर्णय झाल्यानंतरच त्यांना सांगण्यात आल. जर गांधीचा फाळणीला पाठिंबा असता तर ते सत्तांतराच्या कार्यक्रमाला गैरहजर राहिले नसते. जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा गांधी पश्चिम बंगालमधील नौखाली भागामध्ये धार्मिक दंगली रोखण्यासाठी उपोषणाला करत होते.

लोक धार्मिक सहिष्णूता, अहिंसा आणि शांतता राखण्यासाठी केलेले उपदेश पाळत नाहीत, त्यामुळे गांधीनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. नैतिकता पाळण्याशिवाय गांधीपुढे पर्याय नव्हता. नैतिकतेच्या विचारांमुळेच ते लोकांना हिंसेपासून परावृत्त करत होते.

फाळणीच्या वेळी धार्मिक दंगली उसळल्यानंतर गांधीजींनी अल्पसंख्यांकांच्या रक्षणासाठी उपोषणाला बसले. भारतामध्ये मुस्लिम अल्पसंख्याक आणि पाकिस्तानातील शीखांच्या समर्थनार्थ गांधींनी उपोषण सुरू केले होते. त्यामुळे कट्टर हिंदुत्त्ववादी लोक गांधीजींवर नाराज होते. या कट्टर लोकांनी त्यांना बदनाम करण्याचा, त्यांच्या बद्दल अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तान सरकारला साडेपाच कोटी द्यावेत, असे गांधी म्हणतायेत अशी अफवा पसरवली. मात्र, खरंतर ही रक्कम भारताला मिळणार होती. गांधी असे एकमेव व्यक्ती होते ज्यांनी फाळणीच्या वेळी हिंदू मुस्लिमांच्या एकतेसाठी काम केलं. गांधीच्या एकतेच्या या विचारांना पाकिस्तानमध्येही मान्यता मिळत होती.

गांधी हिंदुबरोबर जसे कठोरपणे वागतात तसे ते मुस्लिमांसोबत वागत नाहीत, असं काही लोकांच म्हणण होते. तसंच ते मुस्लिमांना खुश करायला पाहतायंत, असेही काहीजण म्हणायचे. मात्र, हे सर्व खोटं आहे. आंदोलनाच्या दरम्यान काही मुस्लिम गांधींना भेटायला आले होते. तेव्हा पाकिस्तानात अल्पसंख्यांकावर होत असलेल्या हिंसेचा निषेध करण्यास गांधींनी भारतीय मुस्लिमांना सांगितलं होते. भारतातील अल्पसंख्यांकांना चांगली वागणूक दिली जाईल, त्यामुळे पाकिस्ताननेही अल्पसंख्यांकांना चागली वागणूक द्यावी, असे गांधीजी म्हणायचे.

गांधीजींच्या प्रभावामुळे धार्मिक दंगली कमी होण्यास काही प्रमाणात मदत झाली. गांधींची हत्या झाली त्यावेळी सर्व दंगली थांबल्या होत्या. आरएसएसवर बंदी घालण्याची घोषणाही सरदार पटेलांनी केली होती. पण त्यानंतर ४० वर्षांनी धर्मांधतेने पुन्हा डोकं वर काढलं. बाबरी मशीद पाडण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण देश धार्मिकतेच्या आगीमध्ये सापडला.

आता पहिल्यांदा उजव्या विचारसरणीचे लाक सत्तेमध्ये आले आहेत. त्यांच्याकडून धार्मिक राजकारण केलं जातयं. अनेक राज्यांमध्ये त्यांचे सरकार आहेत. आताच्या काळात झुंडबळीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गोमांस खाण्यावरुन मुस्लिमांना लक्ष करण्यात येतयं. त्यांच्या आवाज दाबला जातोय. हे सर्व लोकशाहीच्या विरोधात आहे. देशाच्या इतिहासात असं कधीही झाल नाही. धार्मिक राजकारणाने सैतानी शक्तींना पुढे आणलं आहे.

धार्मिकतेचं बीज आपण सर्वांमध्ये रोवल गेलयं, असं वाटत आहे. माणसामध्ये चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी असतात. त्यामुळे आपण जशा वातावरणात राहतो त्यानुसारच आपण वागतो. बाबरी मशीद पाडल्यानंतर कट्टर धार्मांध विचारांचा वेगाने प्रसार झाला आणि तो वाढतच गेला. गांधीना ज्या लोकांनी प्रत्यक्षात पाहिलंय. ती लोकही आता आपल्यात राहिली नाहीत. धार्मिक सहिष्णुतेच्या विचारांचे लोक आता आपल्यात नाहीत. सहिष्ण विचार असणाऱ्यांच्या पिढ्याही आता नष्ट झाल्यात.

जमात -ए - इस्लाम संघटनेनं एकदा धार्मिक सहिष्णुतेवरील कार्यक्रमाला मला आंमत्रित केलं होते. मात्र, आयोजक जर मला हिंदुंचा प्रतिनिधी म्हणून कार्यक्रमात बोलावणार असतील तर मी येणार नाही, कारण मी नास्तिक आहे, माझा देवावर विश्वास नाही, असं आयोजकांना सांगितलं. त्यानंतर त्यांनी मला कार्यक्रमाला बोलावलं नाही.

नास्तिकता ही धार्मिक सहिष्णुता राखण्यास मदत करेल, असं मी कार्यक्रमाच्या आयोजकांना सांगितलं. कारण कोणताही व्यक्ती जर एखादा धर्म मानत असेल तर तो स्वत:च्या धर्मावर निष्ठा ठेवेल. त्यामुळे आपण सर्वांनी धार्मिक सहिष्णुतेला धर्माच्या नजरेतून पाहायला नको. सहिष्णुतेबद्दल आपण फारच वरवरचा विचार करतो. ते काहीही असो मात्र, आज आपण एका विचित्र वातावरणात राहत आहोत.

(लेखक- संदीप पांडे)
लेखातील विचार हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Aug 18, 2019, 4:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.