भोपाळ - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अनूपपूर जिल्ह्यातील अमरकंटकच्या दौऱ्यावर आहेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय जनजातीय विद्यापीठात होणाऱ्या संमेलनात कोश्यारी सहभागी झाले. राष्ट्रगीताने या संमेलनाची सुरूवात झाली. विद्यापीठाचे कुलगुरु एस. पी. एम त्रिपाठी यांनी स्मृतीचिन्ह देवून कोश्यारी यांचे स्वागत केले. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी भारतीय सांस्कृतिक विचारांची वैज्ञानिक कारणे आणि विविध प्रथा यावर आपले विचार मांडले.
हेही वाचा - नमस्ते ट्रम्प : ताजमहाल पाहून भारावले ट्रम्प दाम्पत्य, आता दिल्लीला रवाना..
कोश्यारी म्हणाले की, वसुधैव कुटूंबकम या संकल्पनेवर आधारित आपली संस्कृती संपूर्ण जगाच्या कल्याणाचा संदेश देते. तसेच स्त्रीत्वाचे महत्त्व सांगताना त्यांनी महिलांच्या सन्मानाशी संबंधित भारतीय सांस्कृतिक वैशिष्ठ्यांवर आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान विद्यापीठ परिसरात असलेल्या आदिवासी मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लघु नाटकातून संस्कृत भाषेच्या पुनरुज्जीवनाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणामुळे राज्यपालांसह सर्व उपस्थित मंत्रमुग्ध झाले. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी आदिवासी मॉडेल स्कूलला भेट देवून विद्यार्थी आणि शैक्षणिक कर्मचार्यांशी चर्चा करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी डीआयजी शहडोल रेंज पी एस उईके, जिल्हाधिकारी चंद्रमोहन ठाकूर, पोलिस अधीक्षक श्रीमती किरणलता केरकेट्टा यांच्यासह विद्यापीठाचे प्राध्यापक, विभागप्रमुख साधू संत आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.