ठाणे- दिवा भागातील एका मिठाईच्या दुकानाला आग लागली. ही घटना आज पहाटे २.३० च्या सुमारास घडली. या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही, अशी माहिती ठाण्याचे विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख संतोष कदम यांनी दिली.
दरम्यान आग विझवण्यासाठी मुंब्र्यातील अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळाकडे निघाले होते. मात्र, रस्ता खराब असल्याने अग्निशामक वाहनाचे हायड्रॉलिक पाईप तुटले. यावेळी इतर अग्निशामक वाहनाच्या मदतीने हे वाहन घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर अग्निशामक पथकाने दुकानाला लागलेली आग विझवली. आग लागल्याचे कारण अद्याप समजले नसल्याचे संतोष कदम यांनी सांगितले.
हेही वाचा- पोलीस स्टेशन नाही "पोलीस ठाणे" असले पाहिजे, मराठी एकीकरण समितीची राज्यसरकारकडे मागणी