नवी दिल्ली - देशातील लॉकडाऊनसंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. सुमारे चार ते पाच तास चाललेल्या या बैठकीनंतर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत लॉकडाऊन वाढल्याचे संकेत दिले आहेत.
केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटले, की लॉकडाऊन वाढवण्याचा पंतप्रधान मोदींनी घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे. देशात लवकर लॉकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे आज भारतातील परिस्थिती कित्येक प्रगत देशांहून पुढे आहे. जर आता हे हटवण्यात आले, तर आपण आतापर्यंत जे काही कमावले आहे, ते गमावू. त्यामुळे हा लॉकडाऊन वाढवणेच गरजेचे आहे.
-
PM has taken correct decision to extend lockdown. Today, India’s position is better than many developed countries because we started lockdown early. If it is stopped now, all gains would be lost. To consolidate, it is imp to extend it
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">PM has taken correct decision to extend lockdown. Today, India’s position is better than many developed countries because we started lockdown early. If it is stopped now, all gains would be lost. To consolidate, it is imp to extend it
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 11, 2020PM has taken correct decision to extend lockdown. Today, India’s position is better than many developed countries because we started lockdown early. If it is stopped now, all gains would be lost. To consolidate, it is imp to extend it
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 11, 2020
केजरीवाल यांच्या ट्विटपूर्वीच सूत्रांकडून अशी माहिती मिळाली होती, की लॉकडाऊन वाढवण्यास सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची संमती आहे. त्यानंतर केजरीवाल यांच्या ट्विटमुळे लॉकडाऊन वाढणार आहे यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, अद्याप याची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
हेही वाचा : पंतप्रधान मोदींनी गमछाचा मास्क म्हणून केला वापर...