ETV Bharat / bharat

बाडमेर दुर्घटनेचा Live व्हिडियो : कथावाचकाने दिला इशारा... पळा, पळा... मंडप उडतोय

कथावाचक यादरम्यान इकडे-तिकडे पहात म्हणाले, 'पाहा.. वारा आणि पाऊस वाढला आहे. कथावाचन थांबवावे लागेल. बघा..बघा मंडप उडतोय. बाहेर पडा, मंडप रिकामा करा...'

पळा, पळा... मंडप उडतोय
author img

By

Published : Jun 23, 2019, 8:33 PM IST

Updated : Jun 23, 2019, 11:43 PM IST

बाडमेर - जिल्ह्यातील जसोल गावात रविवारी श्री राम कथा सुरू असताना मंडप कोसळल्याने १५ जणांचा मृत्यू झाला. तर, ५० जण जखमी झाले. राम कथा सुरू असताना जोरदार वारा आणि पावसामुळे हा मंडप कोसळला. या घटनेचा लाईव्ह व्हिडियो समोर आला आहे. यात कथावाचक 'पावसाचा आणि वाऱ्याचा जोर वाढलाय. कथा थांबवावी लागेल. पळा, पळा... मंडप उडतोय. लोकांना बाहेर काढा. मंडप रिकामा करा. मंडप उडतोय... निघा निघा...' असा धोक्याचा इशारा भाविकांना देताना दिसत आहे. यानंतर कथावाचकानेही येथून त्वरेने काढता पाय घेतल्याचे व्हिडियोत दिसत आहे.

बाडमेर दुर्घटनेचा Live व्हिडियो

जिल्ह्यातील बालोतरा येथील जसोल गावात ही दुर्घटना घडली. येथे राम कथा वाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मोठ्या संख्येने वृद्ध, महिला आणि लहान मुले आली होती. अचानक वातावरण बदलले. जोरदार वारा आणि पावसाला सुरुवात झाली. कथावाचक यादरम्यान इकडे-तिकडे पहात म्हणाले, 'पाहा.. वारा आणि पाऊस वाढला आहे. कथावाचन थांबवावे लागेल. बघा..बघा मंडप उडतोय. बाहेर पडा, मंडप रिकामा करा...' यामुळे लोकांमध्ये एकदम पळापळ झाली. कथावाचकही लगबगीने उठून निघाले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अचानकपणे मंडप कोसळू लागल्याने घटनास्थळी गोंधळ माजला. लोक इकडे-तिकडे पळू लागले. काही लोकांचा मंडपाखाली सापडून गुदमरून मृत्यू झाला. पाऊस सुरू असल्याने पडलेल्या मंडपातील विजेच्या तारांमुळे विद्युतप्रवाह पसरला. यामुळेही विजेचा झटका बसून काही लोकांचा मृत्यू झाला. घटनेच्या चौकशीनंतर अनेक बाबी स्पष्ट होतील, असे सांगण्यात आले आहे.

मुख्यमंत्री गेहलोत यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. तसेच, स्थानिक प्रशासनाला बचावकार्य तातडीने राबवण्याचे आणि शक्य ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.

  • जसोल,बाड़मेर में राम कथा के दौरान टेंट गिरने से हुए हादसे में बड़ी संख्या में लोगों की जान जाने की जानकारी अत्यंत दुखद, दुर्भाग्यपूर्ण है।ईश्वर से दिवंगतों की आत्मा को शांति प्रदान करने,शोकाकुल परिजनों को सम्बल देने की प्रार्थना है। घायलों के शीघ्र स्वास्थ्य लाभ की कामना करता हूँ

    — Ashok Gehlot (@ashokgehlot51) June 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • स्थानीय प्रशासन द्वारा राहत एवं बचाव का कार्य किया जा रहा है।
    सम्बंधित अधिकारियों को हादसे की जांच करने, घायलों का शीघ्र उपचार सुनिश्चित करने तथा प्रभावितों एवं उनके परिजनों को हरसंभव सहायता उपलब्ध कराने के निर्देश दिए हैं। #Barmer #Rajasthan

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jun 23, 2019, 11:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.