ETV Bharat / bharat

LIVE: दिल्लीत शेतकरी रस्त्यावर... 5 डिसेंबरला देशव्यापी आंदोलन पुकारणार - farmers protest in delhi

farmers protest in delhi
LIVE: दिल्लीत शेतकरी रस्त्यावर... कृषीविधेयकाला विरोध कायम
author img

By

Published : Dec 2, 2020, 11:38 AM IST

Updated : Dec 2, 2020, 6:03 PM IST

17:56 December 02

पाच डिसेंबरला संपूर्ण देशात निदर्शने होणार

farmers protest in delhi
पाच डिसेंबरला संपूर्ण देशात निदर्शने होणार

पाच डिसेंबरला संपूर्ण देशभरात आंदोलन छेडले जाणार असून कॉर्पोरेट हाऊसेसच्या विरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत. तसेच यावेळी प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन होणार आहे.

17:55 December 02

आमच्यात फूट पाडण्याचे केंद्राचे षडयंत्र - भारतीय किसान युनियन

हे सरकार विविध मार्गांनी शेतकऱ्यांचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आमच्या एकजुटीने सरकारच्या या षडयंत्रावर पाणी फेरले आहे.

17:55 December 02

देशातील सर्व शेतकऱ्यांचे नेतृत्व करणार संयुक्त किसान मोर्चा

शेतकऱ्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संयु्क्त किसान मोर्चा संघटना देशातील सर्व शेतकऱ्यांचे नेतृत्व करणार असल्याचे शेतकरी नेत्यांनी जाहीर केले.  

17:38 December 02

उद्या आम्ही कायद्यातील सर्व बाबींवर लिखीत अहवाल देऊ - शेतकरी संघटना

उद्या कायद्यातील सर्व बाबींवर लिखीत अहवाल देणार असल्याचे संयुक्त किसान संघटनेने सांगितले.

15:48 December 02

"एकतर हक्क घेऊन जाऊ...नाहीतर सीमेवरच जीव देऊ", आंदोलनकर्त्यांचा ठिय्या

दिल्ली-हरयाणा बॉर्डवर मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना अडवण्यात आले आहे. आम्ही हक्काची लढाई लढत असून, आमच्यावरील शोषणाविरोधात न्याय मागत असल्याचे विधान शेतकऱ्यांनी केले. 

15:42 December 02

आम्हाला न्याय मिळालाच पाहीजे - शेतकरी संघटना आक्रमक

भारतीय किसान संघटनेचे नेते महेंद्र सिंह यांनी सरकारसोबत बोलणी सुरू असल्याचे सांगितले. मात्र यातून कोणताही तोडगा न निघाल्यास सीमावर्ती भागात निदर्शने कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

15:38 December 02

दिल्ली-हरयाणा रस्त्यांवर 'चौक्या आणि चेकींग'

दिल्ली-हरयाणाला जोडणारी झडोदा सीमा सील करण्यात आली आहे. कालपर्यंत या समीवेवरून वाहतूक सुरू होती. मात्र आज रस्ता बंद करण्यात आला आहे. दिल्लीतून हरयाणाला जाण्याची मुभा आहे. मात्र हरयाणातून दिल्लीत येणाऱ्या लोकांची चौकशी होत आहे. अनेक संशयितांना आडवण्यात आले आहे.

15:34 December 02

'हे' राष्ट्रीय महामार्ग सुरू

नोएडा आणि दिल्लीला जोडणारा डीएनडी राष्ट्रीय महामार्ग अद्याप सुरू आहे. याव्यतिरिक्त धनसा, दोराला, कापसहेडा या सीमा अद्याप सुरू आहेत. यासोबतच राजोकरी राष्ट्रीय महामार्गासह बिजवासन, पालम हे रस्ते अद्याप सुरू आहेत.

15:31 December 02

दिल्लीच्या प्रमुख चार सीमा बंद; पोलीस बंदोबस्तासह सर्व परिसरात कुंपण

दिल्लीत मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते एकत्र येण्याची शक्यता असल्याने सकाळपासून राजधातील येणाऱ्या चार सीमा बंद करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने सिंघू, टीकरी, चिल्ली आणि गाजीपूरचा समावेश आहे.

15:29 December 02

दिल्लीतील सर्व रस्ते आणि महामार्ग बंद पाडणार - शेतकरी संघटना

नोएडाच्या महामाया फ्लायओव्हरवर 81 गावांतून जनसमुदाय एकत्र

15:26 December 02

महामाया उड्डाणपुलावर 'चक्का जाम'

नोएडा - महामाया उड्डाणपुलावर मोठ्या संख्येने भारतीय किसान संघटनेचे शेतकरी उपस्थित आहेत. त्यांनी याठिकाणी चक्काजाम केला असून थोड्याच वेळात सर्व आंदोलनकर्ते दिल्लीच्या दिशेने कूच करतील.

15:22 December 02

गाझीपूर येथे शेतकऱ्यांसोबत गुरं आंदोलनात सामील

गाझीपूर येथे शेतकऱ्यांसोबत गुरं आंदोलनात सामील झाली आहेत. शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील गायी, म्हैस आणि बैलांना सोबत आणले असून त्यांना देखील आंदोलनात सामील करण्यात आले आहे.

15:19 December 02

'द ग्रेट खली'चा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

स्टार 'द ग्रेट खली' याने पंजाब, हरयाणात सुरू असलेल्या कृषी आंदोलनांना पाठिंबा दिला आहे. याबाबत त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे.

14:01 December 02

रस्त्यावर शेतकऱ्यांची 'मांदियाळी'

कृषी कायद्याविरोधात आंदोलन करताना ठिकठिकाणी जेवणाच्या पंगती वाढण्यात आल्या. शेतकऱ्यांनी रस्त्यावर बसून अन्न ग्रहण केले.

13:58 December 02

फरीदाबाद-बदरपूर मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात

फरीदाबाद-बदरपूर सीमावर्ती भागात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी कॉंक्रिटचे अडथळे आणि बॅरिगेट्स लावून पोलिसांनी रस्ते बंद केले आहेत. मात्र त्यावर चढून विरोध करण्याचा प्रयत्न शेतकरी आंदोलनकर्त्यांनी केला. यामुळे अनेक ठिकाणी वातावरण तापले आहे.

13:52 December 02

मुख्यमंत्री खट्टर यांच्या निवासस्थानाला घेराव; पोलिसांनी केला पाण्याचा मारा

चंदिगढ - मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या निवासस्थानाबाहेर जमून आंदोलकांनी निदर्शने केली. खट्टर यांनी शेतकऱ्यांचा मोर्चा चिरडण्यासाठी पोलीस यंत्रणेचा बेकायदेशीर वापर केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. याबाबत शेतकऱ्यांची माफी मागण्यासाठी मोठा शेतकरी वर्ग खट्टर यांच्या घराबाहेर जमला होता. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याचा मारा केला.

12:05 December 02

अमित शाह यांच्या निवासस्थानी तातडीची बैठक ; केंद्रीय कृषीमंत्री उपस्थित

गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी भाजपाच्या बड्या नेत्यांची बैठक बोलवण्यात आली आहे. यासाठी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर तसेच वाणिज्य मंत्री पियुष गोयल उपस्थित आहेत.

11:58 December 02

हे विधेयक कृषी विरोधात नाही - केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी कृषी विधेयकाला पाठिंबा देत हे बिल शेतकऱ्यांच्या विरोधात नसल्याचे म्हटले आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांची शक्ती वाढणार आहे. या कायद्याअंतर्गत एमएसपी सुरक्षा कायम राहणार असून नवीन संकल्पनांना देखील वाव मिळणार असल्याचे रविशंकर प्रसाद म्हणाले.

11:57 December 02

दिल्ली-हरयाणा सीमा बंद ; तगडा बंदोबस्त

farmers protest in delhi
दिल्ली-हरयाणा सीमा बंद ; तगडा बंदोबस्त

आंदोलक आक्रमक होत असल्याचे पाहता सिंघू बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे. हरयाणा आणि नवी दिल्ली यांना जोडणारी सीमा ही आहे.

11:55 December 02

चिल्ला बॉर्डर पूर्णत: सील

farmers protest in delhi
चिल्ला बॉर्डर पूर्णत: सील

चिल्ला येथील सीमेवर मोठ्या प्रमाणात शेतकरी जमले असून ही सीमा पूर्णत: सील करण्यात आली आहे. घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा असून संपूर्ण परिसरात बॅरिगेट्स लावण्यात आले आहेत. यासोबत पॅरामिलेट्री फोर्सेस देखील तैनात करण्यात आल्या आहे.

11:53 December 02

शेवटच्या श्वासापर्यंत ठिय्या देणार

farmers protest in delhi
शेवटच्या श्वासापर्यंत ठिय्या देणार

भारतीय किसान युनियचे अध्यक्ष भानू प्रताप सिंह यांनी शेतकरी शेवटच्या श्वासापर्यंत बसून लढा देणार असल्याची घोषणा केली आहे. दिल्ली आणि नोएडा यांमधील सीमा सील करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करण्यास अडचण येत आहे. मात्र यावर बोलताना, शेतकरी मागील सत्तर वर्षांपासून अडचणीत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.

सामान्य नागरिकांनी चार दिवस अडचणींचा सामना केल्यास काही फरक पडत नाही. ही आमच्या हक्कांची लढाई आहे. त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या मागण्यांसाठी लढणार आहे, असे भानू प्रताप सिंह यांनी सांगितले.

11:52 December 02

बैठकीत दिले होते आश्वासन

सरकारसोबत झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या हितांसंबंधी तसेच त्यांचे हक्क सुरक्षित ठेवण्याबाबत कटिबद्ध असल्याचे सरकारने सांगितले होते. मात्र अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या नेत्यांनी ही बैठक फिसकटल्याचे सांगितले.

11:28 December 02

LIVE: दिल्लीत शेतकरी रस्त्यावर... 5 डिसेंबरला देशव्यापी आंदोलन पुकारणार

नवी दिल्ली - राजधानीतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यापासून सुरू असणाऱ्या या निदर्शनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. यासाठी पंजाब आणि हरयाणातून दिल्लीत येणारे रस्तेही बंद करण्यात आले आहेत. मात्र शेतकऱ्यांनी अद्याप कायद्याविरोधात निदर्शने कायम ठेवत विविध ठिकाणी ठिय्या दिला आहे. येत्या 5 डिसेंबरला देशव्यापी आंदोलन पुकारणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाने जाहीर केले आहे.

Last Updated : Dec 2, 2020, 6:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.