नवी दिल्ली - पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी आज सायंकाळी ७ वाजता नरेंद्र मोदींचा शपथविधी होणार आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी सकाळीच महात्मा गांधीजी आणि अटलजींच्याही चरणी नतमस्तक झाले. मोदींनी राजघाटवर गांधीजींच्या समाधीचे दर्शन घेऊन आदरांजली वाहिली. त्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासह 'सदैव अटल समाधी' येथे दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन केले. त्यांनी नॅशनल वॉर मेमोरियल येथे हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
नरेंद्र मोदींनी नॅशनल वॉर मेमोरियल येथे हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या भव्य विजयानंतर आज नरेंद्र मोदींचा पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथविधी होणार आहे. या सोहळ्यासाठी 'बिम्सटेक'सह आठ देशांचे नेते उपस्थित राहणार आहेत. बिम्सटेकमध्ये भारताशिवाय भूतान, श्रीलंका, थायलंड, म्यानमार, नेपाल आणि बांगलादेश आहेत. किर्गिस्तानचे राष्ट्रपती आणि मॉरिशसच्या पंतप्रधानांनाही आमंत्रित केले आहे.