ETV Bharat / bharat

हिंसाचारादरम्यान लुटले दारूचे दुकान; दिल्लीच्या चाँद बाग परिसरातील घटना

author img

By

Published : Feb 26, 2020, 8:14 AM IST

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचा फटका सामन्य नागरिक आणि दुकानदारांनाही बसत आहे. चाँद बाग परिसरातील एका दारूच्या दुकानातील बाटल्या लुटल्याची घटना घडली. यात दुकानदाराचे 75 ते 80 लाख रुपयांचे नुकसान झाले.

liquor shop looted in delhi
हिंसाचारादरम्यान लुटले दारूचे दुकान

नवी दिल्ली - राजधानीमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचा फटका दुकानदारांनाही बसत आहे. आंदोलकांनी ईशान्य दिल्लीतील चाँद बाग परिसरातील एका दारूच्या दुकानातील बाटल्या लुटल्याची घटना घडली. हिंसाचारादरम्यान बाटल्या फोडण्यासाठी हे दुकान लुटण्यात आले. या प्रकारात 75 ते 80 लाखांचा मद्यसाठा लुटण्यात आला.

सोमवारी सायंकाळी अचानक काही लोकांनी दुकानात घुसून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यांनी दुकानातील दारूच्या बाटल्या, दोन रेफ्रिजरेटर, स्कॅनर, टीव्ही आणि सीसीटीव्ही यंत्रणेची तोडफोड केली. दुकानातील कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र, घुसखोरांची संख्या जास्त असल्याने त्यांना अपयश आले, अशी माहिती दुकानाचे व्यवस्थापक राज कुमार यांनी दिली.

हेही वाचा - दिल्ली हिंसाचार : दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश, डोवाल यांनी घेतला आढावा

या दरम्यान दोनदा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क करून मदत मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलीस वेळेवर दाखल झाले नाहीत, असेही कुमार यांनी सांगितले. हिंसाचारादरम्यान बेकरी, मेडिकल दुकाने, किराणा दुकाने आणि इतरही शेकडो दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी नागरिकही आपल्या घरांमध्ये अडकून पडले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.