ETV Bharat / bharat

गोवा : दोनापावलात अडकलेल्या पाकिस्तानी जहाजाप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे पंतप्रधानांना पत्र

गिरीश चोडणकर यांनी मुरगाव पोर्ट ट्रस्टच्या हद्दीत अडकलेल्या पाकिस्तानी जहाजाप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. हे जहाज गोव्यात आणण्यामागे  गोवा मंत्रीमंडळातील एका मंत्र्याचा हात असून गोव्याचे मुख्यमंत्री केवळ राजकीय कारणांसाठी दोषींच्या चुकांवर पांघरून घालण्याचे काम करत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे. गोवा सरकार सदर जहाजातील ज्वलनशील पदार्थ बाहेर काढण्यास मागील पंधरा दिवसांपासून पूर्णपणे अपयशी ठरल्याचे त्यांनी पत्रात नमुद केले आहे.

गोवा प्रदेश काॅंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर
author img

By

Published : Nov 11, 2019, 8:30 AM IST

पणजी - गोवा प्रदेश काॅंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मुरगाव पोर्ट ट्रस्टच्या हद्दीत दोनापावल येथे अडकलेल्या पाकिस्तानी जहाजाप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. हे ज्वलनशील पदार्थाने(नाफ्ता) भरलेले जहाज गोव्यात आणण्यामागे गोवा मंत्रीमंडळातील एका मंत्र्याचा हात असून गोव्याचे मुख्यमंत्री केवळ राजकीय कारणांसाठी दोषींच्या चुकांवर पांघरून घालण्याचे काम करत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे. ज्वलनशील पदार्थ भरलेल्या या जहाजामुळे राष्ट्रीय सुरक्षा तसेच गोव्याच्या पर्यावरण व पर्यटनाला धोका उद्भवू शकतो. त्यामुळे, राष्ट्रीय आपत्कालीन सुरक्षा दल, राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि डिफेंस इंटेलिजन्स एजेंसी यांच्याकडे त्वरीत हे प्रकरण सोपवीण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी समुद्रमार्गेच प्रवेश केला होता, याकडे चोडणकर यांनी मोदींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी सदर विषयावर गंभीरपणे लक्ष न देता, वारंवार आपली भूमिका बदलण्याचे सत्र अवलंबल्याचे चोडणकर यांनी पत्रात नमुद केले आहे. यामुळे गोमंतकीयांच्या मनात भीती निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. गोवा सरकार सदर जहाजातील ज्वलनशील पदार्थ बाहेर काढण्यास मागील पंधरा दिवसांपासून पूर्णपणे अपयशी ठरल्याचे त्यांनी पत्रात नमुद केले आहे.

हेही वाचा - 'नाफ्तावाहक जहाज गोव्यात पोहोचवणाऱ्यावर कारवाई होणारच'

सदर जहाजापासुन दोनापावल येथील राजभवन, राजधानी पणजी शहर, दाबोळी आतंराष्ट्रीय विमानतळ तसेच मुरगाव बंदर हाकेच्या अतंरावर असल्याचे आहेत. जहाजात असलेल्या ज्वलनशील पदार्थांमुळे स्फोटासारखी दूर्घटना घडल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते. तसेच राष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका पोहचु शकतो असेही पत्रात म्हटले आहे. मुरगाव पोर्ट ट्रस्टने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले असुन, सदर जहाजाला तडे गेल्यास भंयकर संकट उभे ठाकणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रतिज्ञापत्रामुळे भोपाळ वायु दुर्घटनेसारखी परिस्थिती गोव्यात उद्भवु शकते, असे त्यांनी प्रधानमंत्र्यांच्या नजरेस आणून दिले आहे.

Intro:पणजी : गोवा प्रदेश काॅंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मुरगाव पोर्ट ट्रस्टच्या हद्दीत पाकिस्तानाऊन आलेल्या भरकटलेल्या बेवार जहाजामुळे राष्ट्रीय सुरक्षा तसेच गोव्याच्या पर्यावरण व पर्यटनाला संपवून टाकण्याचे संकट उभे झाले असल्याचे सांगत, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवुन राष्ट्रीय आपत्कालीन सुरक्षा दल, राष्ट्रीय तपास यंत्रणा व डिफेंस इंटेलिजंस एजेंसी यांच्याकडे त्वरीत हे प्रकरण सोपवीण्याची मागणी केली आहे.

Body:नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी समुद्रमार्गेच प्रवेश केला होता याकडे चोडणकर यांनी पत्रातून प्रधानमंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. त्याची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी सदर विषयावर गंभीरपणे लक्ष न देता, वारंवार आपली भूमिका बदलण्याचे सत्र अवलंइल्याचे चोडणकर यांनी पत्रात नमुद केले आहे. यामुळे गोमंतकीयांच्या मनात भीती निर्माण झाल्याचे म्हटले आहे. गोवा सरकार सदर जहाजातील ज्वलनशील पदार्थ बाहेर काढण्यास मागील पंधरा दिवस पूर्णपणे अपयशी ठरल्याचे त्यांनी पत्रात नमुद केले आहे.

सदर जहाजापासुन दोनापावल येथील राजभवन, राजधानी पणजी शहर तसेच मुरगाव बंदर व दाबोळी आतंराष्ट्रीय विमानतळ हाकेच्या अतंरावर असल्याचे आहेत ‌ सदर जहाजात असलेल्या ज्वलनशील पदार्थांमुळे स्फोटासारखी मोठी दुर्घटना घडल्यास मोठी जीवीतहानी होऊ शकते. तसेच राष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका पोहचु शकतो असेही पत्रात म्हटले आहे.

मुरगाव पोर्ट ट्रस्टने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले असुन, सदर जहाजाला तडे गेल्यास महाभंयकर संकट उभे ठाकणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रतिज्ञापत्रामुळे भोपाळ वायु दुर्घटनेसारखी परिस्थीती गोव्यात उद्भवु शकते असे त्यानी प्रधानमंत्र्यांच्या नजरेस आणुन दिले आहे.

सदर जहाज बेकायदेशीरपणे आणण्यास गोवा मंत्रीमंडळातील एका मंत्र्याचा हात असल्याचे सांगुन, त्यामुळेच मुख्यमंत्री केवळ राजकीय कारणांसाठी या भयानक संकटाकडे दुर्लक्ष करुन, सदर प्रकरणांत अडकलेल्यांच्या कृत्यांवर पांघरुण घालण्याच्या प्रयत्न करीत आहेत असे चोडणकर यानी पुढे म्हटले आहे.Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.