ETV Bharat / bharat

चला, जागतिक हत्ती दिनानिमित्त हत्तींना वाचवण्याचा संकल्प करूया..

author img

By

Published : Aug 12, 2020, 6:28 AM IST

हत्ती एक महाकाय सुंदर प्रजाती आहे आणि भूतलावरील सध्या सर्वात मोठा प्राणी आहे. हत्तींचे स्मरणशक्ती चांगली असते. ते कधीही विसरत नाहीत. यावरून ते अतिशय हुशार प्राणी असल्याचे लक्षात येते. खरं पहायचं तर, हत्तींना आपली काहीही गरज नाही. मात्र, आपल्याला त्यांची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक हत्तीला वाचवणे, ही आपली जबाबदारी आहे.

जागतिक हत्ती दिन न्यूज
जागतिक हत्ती दिन न्यूज

नवी दिल्ली - दरवर्षी 12 ऑगस्टला जागतिक हत्ती दिवस साजरा केला जातो. लोकांना हत्तीसारख्या महाकाय प्राण्याचे जतन आणि संरक्षण करण्याचे महत्त्व लक्षात यावे, हा याचा उद्देश आहे. याची सुरुवात पहिल्यांदा 12 ऑगस्ट 2012 ला झाली.

हत्ती हा बहुतांशी सर्वच काळांमध्ये सर्वांना आवडणारा प्राणी राहिला आहे. मात्र तो नामशेष होण्याच्या स्थितीत आहे. हत्तींना कोणत्या धोकादायक बाबींचा सामना करावा लागत आहे. याविषयी लोकांना आणि विविध संस्थांना माहिती मिळावी, यासाठी हा दिवस पाळला जातो. हस्तिदंतासाठी हत्तींची शिकार आणि त्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होणे आणि लोकांचा त्यांच्याबाबतचा निष्काळजीपणा ही हत्ती नामशेष होण्याची प्रमुख कारणे आहेत.

कसा साजरा होतो हत्ती दिवस?

जागतिक हत्ती दिवसाच्या शपथेवर सही केली जाते. या दस्तऐवजामुळे जगभरातील अगणित लोक हत्ती वाचवण्याच्या चळवळीत भाग घेऊ शकतात आणि त्यांच्या त्यांच्या सरकारांवर धोरणे बदलण्यासाठी दबाव आणू शकतात.

सोशल मीडियावरही या महाकाय प्राण्यांना सामोरे जावे लागत असलेल्या समस्या मांडणे, हा एक चांगला पर्याय आहे. या दिवशी लोक हत्तींचे शिकाऱ्यांपासून संरक्षण करणाऱ्या एका संस्थेला देणगी देतात. या संस्थेद्वारे त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या अधिक चांगल्या आणि त्यांच्यासाठी योग्य असलेल्या ठिकाणी नेऊन पुनर्वसन केले जाते. तरीही अशा प्रकारचे बहुतेक भाग सध्या वाढत्या लोकसंख्येच्या फुगवट्यामुळे धोक्यात आले आहेत. यामध्ये सहारामधील आफ्रिकन देशांसह भारताचाही समावेश होतो. येथील शहरे वेगाने वाढत आहेत.

हत्तींना सामोरे जावे लागणाऱ्या समस्या

- हस्तिदंताचा व्यापार

- नैसर्गिक अधिवास नष्ट होणे आणि खंडित होणे

- शिकार आणि व्यापार

- मानव आणि हत्तींचा संघर्ष

- बंदिस्त पालन होणाऱ्या ठिकाणी अयोग्य वागणूक आणि हाताळणी

- हत्तींवरून सफारी

या सर्व समस्या सध्या हत्तींना भेडसावत आहेत. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेच्या ‘लाल यादी’त सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींचा समावेश असुरक्षित म्हणून करण्यात आलेला आहे आणि आशिया खंडातील हत्तींचा समावेश चिंताजनक किंवा धोक्यात असलेले अशा रीतीने केला आहे.

हत्तींच्या समस्यांवर उपाययोजना

- हस्तिदंत पासून बनवलेल्या उत्पादनांना नाकारणे, पियानो, अँटिक दागिने, बांगड्या आणि इतर उत्पादने खरेदी करताना ती हत्तीच्या दातांपासून तयार केलेली नाहीत ना, हे जरूर तपासावे.

- अवैध शिकारीला आळा घालण्यासाठी अंमलबजावणी सक्त व्हावी.

- हस्तिदंताच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी कडक उपाय योजावेत.

- हत्तींचे नैसर्गिक अधिवास सांभाळावेत.

- बंदिस्त सांभाळल्या जाणाऱ्या हत्तींना अधिक चांगली वागणूक मिळावी

- जगभरातील हत्तींचे संवर्धन करू इच्छिणाऱ्या संस्था सध्या हत्तींसाठी संरक्षित अभयारण्य असावे यासाठी प्रयत्नशील आहेत.

कोरोना विषाणूसंसर्गामुळे पसरलेल्या महामारीचा हत्तींवरही परिणाम

लॉकडाऊन लागू झाल्यापासून खासगीरित्या हत्तींचे बंदिस्त पालन केले जाणाऱ्या ठिकाणचे हत्ती भुकेने तडफडत आहेत. व्यापारी उद्देशाने खासगी चालवल्या जाणाऱ्या बंदिस्त पालन गृहांमध्ये हत्तींची स्थिती अत्यंत विचित्र आणि दयनीय बनली आहे. यातील काही ठिकाणचे हत्ती धार्मिक संस्था किंवा मंदिरांकडे आहेत. ते बहुतेक वेळेला लोकांना आशीर्वाद देण्यासाठी असतात. याशिवाय, पर्यटकांना हत्तीवरून सफारी करण्यासाठी हत्ती पाळले जातात. या सर्व हत्तींवर सध्या भुकेने तडफडण्याची वेळ आली आहे. कारण धार्मिक स्थळांवर आणि इतर पर्यटनस्थळांवर पर्यटक येणे थांबले आहे.

हत्तीसारख्या महाकाय प्राण्याचे पालन पोषण करण्यासाठी काही संस्था समाजमाध्यमांवरुन देणग्या मागत आहेत.

नुकत्याच कर्नाटकातील एका माहुताने अशाच पद्धतीने लॉकडाऊन सुरू झाल्यापासून एका व्हिडिओमध्ये त्याच्याजवळील 55 वर्षीय हत्तीला खायला घालण्यासाठी त्याच्याकडे काहीच नसल्याचे सांगितले आहे.

याशिवाय मुधोळ जिल्ह्यातील एका मंदिरातील 40 वर्षीय हत्तीला एरवी गूळ, ऊस, फळे आणि इतर काही धान्ये मंदिरात येणाऱ्या लोकांकडून दिली जात असत. मात्र लॉकडाऊन लागू झाल्यापासून मंदिरात कोणीच येत नाही आणि मंदिराजवळचा हत्तींना घालण्याचा चारा संपत आला आहे.

गोव्यातील जंगल बुक रिसॉर्ट येथील मालक जोसेफ यांच्याजवळ बंदिस्त पालन केले जाणारे पाच हत्ती आहेत. हे सर्व बहुतेक करून पर्यटकांना जंगलात सफारीसाठी आणि त्यांना अंघोळ घालण्यासाठी वापरले जातात. या हत्तींना खायला घालण्यासाठी पुरेसे अन्न नसल्याने त्याने देणग्या मिळाव्यात, यासाठी व्हिडिओ रिलीज केला आहे.

जयपूरमधील अजमेर किल्ला, राजस्थान येथे अनेक हत्ती पाळणारे लोक आहेत. येथे जवळपास शंभर-एक हत्ती पर्यटकांना फिरण्यासाठी वापरले जातात. सध्या पर्यटकच नसल्यामुळे या हत्तींच्या मालकांचे उत्पन्न थांबले आहे. त्यामुळे हत्तींना पुरेसे अन्न खाऊ घालण्यासाठी त्यांना चणचण भासत आहे. याशिवाय, हत्तींचे वैयक्तिकरित्या पालन करणारे अनेक जण केरळ आणि कर्नाटकातील इतर धार्मिक संस्थांमध्ये आहेत. तेही या अतिशय सुंदरशा महाकाय प्राण्यासाठी मदतीची मागणी करत आहेत.

सध्या भारतात जवळपास 3 हजार 500 बंदिस्त पालन केले जाणारे हत्ती आहेत. पर्यटकांच्या सफारीसाठी वापरले जाणारे हत्ती त्यांना दिल्या जाणाऱ्या वाईट वागणुकीमुळे आणि अयोग्य व्यवस्थापनामुळे धोक्यात आहेत. सध्या कुठेही सफारी चालू नसल्यामुळे हत्तींना दिवसभर साखळ्यांनी जखडून ठेवलेले असते. बहुतेक वेळा या साखळ्या तीन मीटर पेक्षाही कमी लांबीच्या असतात. त्यांना दिला जाणारा हा अतिशय अपुरा असतो. तसेच, त्यांना फारसा वैद्यकीय सुविधाही मिळत नाहीत. त्यांना सिमेंट काँक्रीटच्या जमिनीवर ठेवले जाते. तसेच, आजूबाजूला मोठ्याने गाण्यांचा आवाज किंवा रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे ही होणाऱ्या आवाजाने हत्तींना त्रास होतो. जवळपास 77 टक्के हत्ती सध्या भारत, श्रीलंका, थायलंड, नेपाळ आणि कंबोडिया येथे पर्यटकांच्या करमणुकीसाठी वापरले जातात. त्यांना सध्या अतिशय भयानक वागणूक मिळत आहे.

हत्ती आणि परिसंस्था

हत्ती हा नैसर्गिक परिसंस्थेतील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. हत्तीमुळे पर्यावरणातल्या इतर अनेक प्रजातींचे आरोग्य आहार आणि अधिवास सांभाळले जातात.

हत्ती दुष्काळी किंवा पाऊस नसलेल्या काळात जमिनीला मोठे मोठे खड्डे किंवा छिद्रे पाडून पाणी शोधतात. ते पाण्याच्या शोधार्थ त्यांच्या सोंडेचा वास घेण्यासाठी वापर करतात आणि आजूबाजूच्या परिसरातील जमिनीखालील पाणी शोधून काढतात.

हत्ती वेगवेगळ्या प्रकारची झुडपे फळे झाडे खात असल्यामुळे विविध प्रकारच्या बिया त्यांच्या पोटात जातात आणि त्यांच्या विष्ठेतूद्वारे या बिया पुन्हा जमिनीत टाकल्या जातात. या बियांची नवीन झाडे झुडपे गवत तयार होते. अशा पद्धतीने हत्ती बीजप्रसार करतात.

हत्ती त्यांच्या मार्गातली काटेरी झाडे झुडपे उपटून काढतात यामुळे लहान-सहान प्राण्यांसाठी रस्ता तयार होतो.

हत्ती अन्न देतात - हत्ती दिवसभरात जवळपास 15 वेळेला विष्ठा टाकतात. याच्यामुळे विविध प्रजातींसाठी अन्न तयार होते. विविध प्रजातींमधल्या किड्यांच्या झुंडीच्या झुंडी या विष्ठेवर तुटून पडलेल्या असतात आणि हे किडे पक्षांसाठी अन्न ठरतात.

हत्तींमुळे निवारा तयार होतो - उन्हाळ्यात किंवा दुष्काळात हत्ती पाण्याच्या शोधात जमिनीत मोठमोठे खड्डे किंवा चित्रे पाडतात. अशी चित्रे पावसाळ्यात पाणी भरल्यानंतर बेडकांसाठी त्यांची अंडी ठेवण्यासाठी आणि पिल्ले सांभाळण्यासाठी आदर्श वातावरण तयार करतात.

हत्तींमुळे नैसर्गिक मीठ मिळते - हत्तींना वासाचे चांगले ज्ञान असते. त्यांच्या सोंडेने ते जमिनीतला वेगवेगळा भाग धुंडाळून मोठ्या प्रमाणात क्षार शोधून काढतात. त्यानंतर त्याठिकाणी माती खोदून ते क्षार ते स्वतः खातात. नंतर उरलेल्या भागांमध्ये इतर प्राणीही येऊन त्यांच्या शरीरातील क्षारांचे प्रमाण वाढवण्यासाठी ते खातात.

हत्ती एक महाकाय सुंदर प्रजाती आहे आणि भूतलावरील सध्या सर्वात मोठा प्राणी आहे. हत्तींचे स्मरणशक्ती चांगली असते. ते कधीही विसरत नाहीत. यावरून ते अतिशय हुशार प्राणी असल्याचे लक्षात येते. खरं पहायचं तर, हत्तींना आपली काहीही गरज नाही. मात्र, आपल्याला त्यांची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक हत्तीला वाचवणे, ही आपली जबाबदारी आहे.

वन्यजीव संरक्षण कायदा

राष्ट्रीय वन्यजीव वारसा 2010 मध्ये जाहीर केल्यानुसार हत्तीला ही वाघासारखाच वन्यजीव वारशाचा दर्जा आहे. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये 2002 मध्ये सुधारणा करण्यात आली. यानुसार, हत्तींचे बंदिस्त पालन करणाऱ्या कोणालाही वनखात्याच्या परवानगीशिवाय कोणत्याही नोंदणीकृत नसलेल्या व्यक्तीला किंवा संस्थेला हत्ती देता येणार नाहीत, अशी तरतूद केली आहे. शिवाय हत्तींचा आणि हस्तीदंत यांच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठीही विविध उपाययोजना केल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.