ETV Bharat / bharat

अक्साई चीनवरचा हक्क सोडा आणि तडजोड करा; सुधींद्र कुलकर्णींचा पंतप्रधान मोदींना सल्ला - सुधींद्र कुलकर्णी

ज्येष्ठ पत्रकार सुधींद्र कुलकर्णी यांनी अलिकडे न्यू फोरम फॉर साऊथ एशियाची स्थापना केली आहे. त्यामार्फत ते भारत, चीन व पाकिस्तान या तीन देशांनी परस्पर सहकार्याने आपापले प्रश्न सोडवावेत, अशी मांडणी करत असतात. आता भारत-चीन संघर्षाबाबत कुलकर्णी यांनी केलेले वक्तव्य नवा वाद निर्माण करण्याची शक्यता आहे.

india china border dispute
भारत चीन सीमा विवाद
author img

By

Published : Jun 23, 2020, 6:03 AM IST

हैदराबाद - ज्येष्ठ पत्रकार सुधींद्र कुलकर्णी आणि वाद यांचे खूप जवळचे नाते आहे. एकेकाळचे कट्टर कम्युनिस्ट असलेले कुलकर्णी बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर भाजपचे सदस्य बनले तेव्हा अनेकांना हादरा बसला. पुढे ते पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व नंतर लालकृष्ण अडवाणी यांचे जवळचे सल्लागार बनले. अडवाणी यांनी पाकिस्तानात जाऊन जिनांची केलेल्या स्तुतीच्या भाषणाचा मूळ मसुदा हा कुलकर्णी यांचाच होता, असा प्रवाद होता.

सुधींद्र कुलकर्णी यांनी अलिकडे न्यू फोरम फॉर साऊथ एशियाची स्थापना केली आहे. त्यामार्फत ते भारत, चीन व पाकिस्तान या तीन देशांनी परस्पर सहकार्याने आपापले प्रश्न सोडवावेत, अशी मांडणी करत असतात. आता भारत-चीन संघर्षाबाबत कुलकर्णी यांनी केलेले वक्तव्य नवा वाद निर्माण करण्याची शक्यता आहे.

भारताने अक्साई चीनवरचा दावा सोडून देऊन तडजोडीची भूमिका स्वीकारावी असे कुलकर्णी यांचे म्हणणे आहे. अर्थात कुलकर्णी यांना वाद उसळणार याची पूर्ण कल्पना आहे. मला देशद्रोही म्हणालात तरी बेहत्तर पण देवाणघेवाणीनेच हे प्रश्न सुटू शकतील, असे मत ते आग्रहाने मांडतात. याच संदर्भात इटीव्ही भारतला त्यांनी एक खास मुलाखत दिली. त्यातील काही महत्वपूर्ण भाग...

हेही वाचा... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या सुरक्षेविषयी बोलताना शब्द विचारपूर्वक वापरावेत- मनमोहन सिंह

लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैन्याबरोबर झालेल्या चकमकीत भारताचे वीस जवान मारले गेले. त्यामुळे दोन्ही देशांमधील सीमा प्रश्न आज चिघळला आहे. परंतु, खरे तर या प्रश्नावर १९६० साली चीनने जो तोडगा सुचवला होता त्याच्या आधारे आजदेखील हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो, असे मत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

आपल्या भ्रामक अहंकारामुळे चीनच्या तोडग्यावर विचार झाला नाही...

विशेष म्हणजे त्यानंतरही अनेक वेळा हा प्रस्ताव मांडण्यात आला. पण आपल्या भ्रामक अहंकारामुळे आपण त्यावर विचार केला नाही असे त्यांनी नमूद केले.

तडजोड म्हणजे देशाचा पराभव नव्हे तर त्यातच देशाचे हित...

भारताने चीनपेक्षा स्वतःला कमकुवत समजू नये. भारताला आपण सहज नमवू शकू असा चीनचा समज असेल तर तोही चुकीचा आहे, असे स्पष्ट करून कुलकर्णी म्हणाले की, मोदी यांच्यामागे आज प्रचंड बहुमत आहे. त्यामुळे तडजोड म्हणजे देशाचा पराभव नव्हे तर त्यातच देशाचे हित आहे हे तेच लोकांना पटवून देऊ शकतील.

...अशा स्थितीत गरिबी दूर करणे हा खरा राष्ट्रवाद

काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनीही या प्रस्तावावर पक्षीय राजकारण न करता मोदींना पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कोरोनामुळे स्थलांतरित मजुरांची जी परवड आपल्या देशात झाली ती जगाने पाहिली आहे, अशा स्थितीत गरिबी दूर करणे हा खरा राष्ट्रवाद आहे असा टोलाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

हेही वाचा... 'तुमचे सैनिक झटापटीमध्येही जिंकू शकत नाहीत, मग युद्धाचा विचारच सोडा'; चीनी ड्रॅगनचे फुत्कार!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.