नवी दिल्ली- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली अनंतात विलीन झाले आहेत. यमुना नदीकाठी निगमबोध स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा रोहन जेटली यांनी अरुण जेटली यांना मुखाग्नी दिला. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय लोटला होता. तसेच अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
LIVE UPDATE:
- अरुण जेटली अंनतात विलीन,शासकिय इतमामात निगमबोध स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
- जेटलींना अखेरचा निरोप देण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही उपस्थिती
- अध्यात्मिक गुरु रामदेब बाबा जेटलींच्या अंत्यसंस्कारासाठी आले आहेत..
- भाजपच्या नेत्यांसह विविध पक्षाचे नेतेही अंत्यसंस्कारासाठी उपस्थित
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही जेटलींच्या अंत्यसंस्कारास उपस्थित
उपराष्ट्रपती वैकंय्या नायडू, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह निमबोध घाट येथे दाखल झाले आहेत. फुलांनी सजवलेल्या गाडीतून त्यांचे पार्थिव निगमघाट स्मशानभुमीत आणण्यात आले. थोड्याच वेळात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. अंत्यविधीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवर आले आहेत. भाजप कार्यकर्ते, नेते आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
शनिवारी अरुण जेटलींचे पार्थिव एम्स रुग्णालयातून त्यांच्या घरी आणण्यात आले. काल दुपारी १२ वाजून ७ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक महिने आजाराशी सामना करणाऱ्या जेटलींनी वयाच्या ६६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. थकवा, श्वसनाचा त्रास आणि अस्वस्थ वाटू लागल्याने जेटली यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आजाराशी त्यांची झुंज अपयशी ठरली.