ETV Bharat / bharat

न्यायालयाच्या निकालावर पुनर्याचिका दाखल करण्यास कुलभूषण जाधव यांचा नकार - पाकिस्तान - कुलभूषण जाधव खटला

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या नियमावलीनुसार पाकिस्तान कार्यवाही करत आहे. त्यानुसार कुलभूषण खटल्याच्या निकाला आढावा घेण्यात येत आहे, असे पाकिस्तानने यावर्षी मे महिन्यात सांगितले होते.

कुलभूषण जाधव
कुलभूषण जाधव
author img

By

Published : Jul 8, 2020, 3:47 PM IST

इस्लामाबाद - हेरगिरीच्या आरोपाखाली भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या अटकेत आहेत. जाधव यांना पाकिस्तानने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. मात्र, या निकालाविरोधात पुनर्याचिक दाखल करण्यास कुलभूषण जाधव यांनी नकार दिल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. जाधव यांना एप्रिल 2017 साली पाकिस्तानने ताब्यात घेतले असून हा खटला आता आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुरु आहे.

खटल्याचा निकाल आणि आरोपांवर पुनर्याचिका दाखल करायची आहे का? असे कुलभूषण जाधव यांना 17 जून 2020 ला विचारण्यात आले होते. मात्र, कायदेशीर हक्कांचा वापर करत त्यांनी सुनावलेल्या शिक्षेवर पुनर्याचिका आणि निकालाचा आढावा घेण्यास नकार दिला, असे पाकिस्तानच्या अ‌ॅडिशनल अ‍ॅटर्नी जनरल यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या नियमावलीनुसार पाकिस्तान कार्यवाही करत आहे. त्यानुसार कुलभूषण खटल्याच्या निकालाचा आढावा घेण्यात येत आहे, असे पाकिस्तानने यावर्षी मे महिन्यात सांगितले होते. पाकिस्तानने निकालाचा आढावा घ्यावा, तसेच त्यांना कौन्सिलर(वकील) सहाय्य उशीर न करता द्यावे, असा निर्णय आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जुलै 2019 मध्ये दिला होता.

भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव(49) यांना पाकिस्तानने हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली 2017 साली एप्रिल महिन्यात अटक केली होती. या प्रकरणी पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. कुलभूषण जाधव हे हेर नसून व्यावसायासाठी अफगाणिस्तानात गेले होते. पाकिस्तानने त्यांना खोट्या आरोपाखाली अटक केल्याचे म्हणत भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे. मागील वर्षी न्यायालयाने त्यांच्या शिक्षेवर स्थगिती दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.