ETV Bharat / bharat

कोण आहेत कुलभूषण जाधव?

भारताने अनेकदा प्रयत्न केल्यानंतर अखेर पाकिस्तानने डिसेंबरमध्ये जाधव यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी दिली होती. 'इस्लामिक परंपरांनी दाखवलेल्या मार्गांनुसार आणि केवळ मानवाधिकाराच्या मुद्द्यावर ही भेट घेण्याची परवानगी दिल्याचे' पाकिस्तानने म्हटले होते.

कुलभूषण जाधव
author img

By

Published : Jul 17, 2019, 1:38 PM IST

Updated : Jul 17, 2019, 7:18 PM IST

नवी दिल्ली - भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधवप्रकरणी संयुक्त राष्ट्रांचे हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (ICJ) आज निकाल दिला आहे. न्यायालयाने त्यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.

कोण आहेत कुलभूषण जाधव?

  • कुलभूषण जाधव हे भारताचे माजी नौदल अधिकारी आहेत. त्यांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी हेरगिरी आणि देशविरोधी घातपाती कारवायांसाठी ३ मार्च २०१६ मध्ये अटक केली होती. त्यांनी जाधव हे भारतीय हेर असल्याचा दावा केला होता. त्यानंतर पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने जाधव यांना फाशीची शिक्षा दिली होती. मात्र, भारताने जाधव यांना इराणमधून पळवून पाकिस्तानात नेण्यात आल्याचे म्हटले आहे.
  • जाधव हे नौदलातून निवृत्त झाल्यानंतर इराणमध्ये व्यापाराशी संबंधित कामांसाठी गेले होते. त्यांचा सरकारशी काही संबंध नाही. भारताने याविषयी आंतरराष्ट्रीय न्यायालयात अपील केल्यानंतर जाधव यांच्या फाशीला स्थगिती देण्यात आली होती.
  • भारताने अनेकदा प्रयत्न केल्यानंतर अखेर पाकिस्तानने डिसेंबरमध्ये जाधव यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी दिली होती. 'इस्लामिक परंपरांनी दाखवलेल्या मार्गांनुसार आणि केवळ मानवाधिकाराच्या मुद्द्यावर ही भेट घेण्याची परवानगी दिल्याचे' पाकिस्तानने म्हटले होते.
  • दरम्यान, भारताने भारतीय राजदूताला या भेटीवेळी जाधव यांच्या कुटुंबीयांसह उपस्थित राहू देण्याची विनंती केली होती. जाधव यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानकडून कोणत्याही प्रकारे त्रास दिला जाणार नाही, याची हमी भारताने मागितली होती. या दोन्ही मागण्या मान्य करत पाकिस्तानने जाधव यांच्या आई आणि पत्नीला व्हिसा मंजूर केला होता.
  • भारताने अनेकदा विनंती करूनही पाकिस्तानने जाधव यांना वकील देण्यास नकार दिला. जाधव यांना वकील दिल्यास त्यांनी हेरगिरीतून मिळवलेली माहिती नवी दिल्लीपर्यंत पोहोचेल, असा दावा पाकने केला होता.

Intro:Body:

-------------

कोण आहेत कुलभूषण जाधव?

कुलभूषण जाधव हे भारताचे माजी नौदल अधिकारी आहेत. त्यांना पाकिस्ताननी अधिकाऱ्यांनी हेरगिरी आणि देशविरोधी घातपाती कारवायांसाठी ३ मार्च २०१६ मध्ये अटक केली होती. त्यांनी जाधव हे भारतीय हेर असल्याचा दावा केला होता. पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली होती.

मात्र, भारताने जाधव यांना इराणमधून पळवून पाकिस्तानात नेण्यात आल्याचे म्हटले आहे. जाधव हे नौदलातून निवृत्त झाल्यानंतर इराणमध्ये व्यापाराशी संबंधित कामांसाठी गेले होते. त्यांचा सरकारशी काही संबंध नाही. भारताने याविषयी आंतरराष्ट्रीय न्यायालयात अपील केल्यानंतर जाधव यांच्या फाशीला स्थगिती देण्यात आली होती.

भारताने अनेकदा प्रयत्न केल्यानंतर अखेर पाकिस्तानने डिसेंबरमध्ये जाधव यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी दिली होती. 'इस्लामिक परंपरांनी दाखवलेल्या मार्गांनुसार आणि केवळ मानवाधिकाराच्या मुद्द्यावर ही भेट घेण्याची परवानगी दिल्याचे' पाकिस्तानने म्हटले होते.

दरम्यान, भारताने भारतीय राजदूताला या भेटीवेळी जाधव यांच्या कुटुंबीयांसह उपस्थित राहू देण्याची विनंती केली होती. जाधव यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानकडून कोणत्याही प्रकारे त्रास दिला जाणार नाही, याची हमी भारताने मागितली होती. या दोन्ही मागण्या मान्य करत पाकिस्तानने जाधव यांच्या आई आणि पत्नीला व्हिसा मंजूर केला होता.

भारताने अनेकदा विनंती करूनही पाकिस्तानने जाधव यांना वकील देण्यास नकार दिला. जाधव यांना वकील दिल्यास त्यांनी हेरगिरीतून मिळवलेली माहिती नवी दिल्लीपर्यंत पोहोचेल, असा दावा पाकने केला होता.

Conclusion:
Last Updated : Jul 17, 2019, 7:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.