पणजी- पर्वरी येथील रोटरी चँरिटेबल ट्रस्टच्या वतीने 28 जुलैला बांबाळी-पणजी येथे रोटरी रेन रनचे आयोजन करण्यात आले आहे. तर जागतिक स्तरावर नावाजलेल्या धावपटू क्रांती साळवी यांची स्पर्धेच्या प्रचारदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.स्पर्धेचे हे पाचवे वर्ष आहे.
पणजीतील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना रोटरी क्लब पर्वरीचे अध्यक्ष निखिल शहा म्हणाले, महिलांचे आरोग्य आणि शिक्षणासाठी सहाय्य करण्यासाठी या वर्षीची ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत गोव्यासह जगभरातील 3 हजार धावपटू सहभागी होणार आहेत. तसेच सैन्यदलातील जवानही यामध्ये सहभाग घेणार आहेत.
या स्पर्धेतून प्राप्त होणारा निधी कर्करोगग्रस्त महिलांचे उपचार आणि शाळांच्या विकासासाठी वापरला जातो. या पत्रकार परिषदेसाठी क्लबचे उपाध्यक्ष अविनाश परमार, सचिवरोनल सिरॉय, गिरीश सावंत आदी उपस्थित होते. स्पर्धकांना क्लबच्या संकेतस्थळालर ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.