ETV Bharat / bharat

सायबर हल्ल्यांपासून सुरक्षा हवीय? मग हे वाचाच... - सायबर विमा पॉलिसी

गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर जून महिन्याच्या सुरुवातीपासून चीनमधून भारतात होणाऱ्या सायबर हल्ल्यांचे प्रमाण २०० टक्क्यांनी वाढले आहे, अशी माहिती सायबर धोक्यांसंदर्भात गुप्तचर संस्था सायफर्माने सादर केलेल्या ताज्या अहवालात प्रसिद्ध झाली आहे. अशावेळी, सर्व व्यक्तींसाठी सायबर सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा निर्माण झाला असून वैयक्तिक सायबर सुरक्षा विमा घेणे अत्यावश्यक होत चालले आहे.

Cyber Security
सायबर सुरक्षा
author img

By

Published : Jul 9, 2020, 1:35 PM IST

Updated : Jul 10, 2020, 12:23 PM IST

हैदराबाद - लोकांच्या दैनंदिन आयुष्यात तंत्रज्ञान खोलवर रुजत चालले आहे. मात्र, यामुळे संवेदनशील वैयक्तिक माहितीसंदर्भात तडजोड होण्याची शक्यता याअगोदर कधीच एवढ्या तीव्र प्रमाणात झाली नव्हती. खरेदी, मनोरंजन, आर्थिक व्यवहार, माहितीची (डेटा) साठवणूक, शिक्षण आणि सामाजिक संवाद यासारख्या अनेक बाबींसाठी लोक अधिकाधिक प्रमाणात इंटरनेटवर अवलंबून राहत आहेत. त्याचप्रमाणे, वर्क फ्रॉम अर्थातून घरातूनच काम करण्याची पद्धतदेखील रुढ होत चालली आहे. अशावेळी, सर्व व्यक्तींसाठी सायबर सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा निर्माण झाला असून वैयक्तिक सायबर सुरक्षा विमा घेणे अत्यावश्यक होत चालले आहे.

भारतीय संगणक आणीबाणी प्रतिसाद कक्षाने (सीईआरटी-इन) १९ जून रोजी सावधगिरीचा इशारा प्रसिद्ध केला होता. काही धुर्त घटकांकडून कोविड-१९ संबंधित उपक्रमांसाठी निधी वाटपाची सबब देत सुमारे २० लाख भारतीयांविरोधात मोठ्या प्रमाणात लोकांना बनावट ई-मेल पाठवण्याची (याला फिशिंग असे म्हणतात) मोहीम राबविली जाण्याची शक्यता आहे, असा इशारा संस्थेकडून देण्यात आला होता. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर जून महिन्याच्या सुरुवातीपासून चीनमधून भारतात होणाऱ्या सायबर हल्ल्यांचे प्रमाण २०० टक्क्यांनी वाढले आहे, अशी माहिती सायबर धोक्यांसंदर्भात गुप्तचर संस्था सायफर्माने सादर केलेल्या ताज्या अहवालात प्रसिद्ध झाली आहे.

अशावेळी आपण मिळवलेला कष्टाचा पैसा, सामाजिक प्रतिष्ठा आणि मानसिक आरोग्याचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. सायबर सुरक्षा संरक्षणामुळे यापैकी काही उद्दिष्ट साध्य करणे शक्य आहे.

वैयक्तिक सायबर विमा पॉलिसी म्हणजे काय?

सायबर सुरक्षेसंदर्भातील नियमांचे उल्लंघन झाल्यानंतर जे संभाव्य धोके उद्भवतात त्याची तीव्रता कमी करणे, यासाठी नुकसान भरपाईचा खर्च ऑफसेट करण्यात लोकांना मदत करण्यासाठी वैयक्तिक सायबर सुरक्षा पॉलिसीची रचना करण्यात आली आहे. १८ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्ती या विमा पॉलिसीसाठी पात्र ठरतात.

वैयक्तिक सायबर विमा कोणी खरेदी करावा?

भारतात कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन आर्थिक व्यवहार करण्यासाठी कोणताही डिजिटल मंच (खरेदी, सबस्क्रिप्शन्स, देयक अदा करणे, पैशांचे हस्तांतरण इत्यादी) वापरणाऱ्या तसेच पेमेंट गेटवे, क्लाऊड सेवा, घरगुती-सहाय्यक किंवा कनेक्टेड उपकरणांचा वापर करणाऱ्या व्यक्तींनी नक्कीच सायबर विमा घेण्याचा विचार करावा.

कोणकोणत्या विमा कंपन्या वैयक्तिक सायबर विमा पॉलिसी प्रदान करतात?

भारतात वैयक्तिक सायबर विमा प्रदान करणाऱ्या तीन प्रमुख कंपन्या आहेत. एचडीएफसी अर्गो, बजाज आलियान्झ जनरल इन्शुरन्स आणि आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स या तीन कंपन्या सायबर विमा सेवा देतात.

याअंतर्गत कोणकोणत्या धोक्यांपासून संरक्षण मिळते?

या पॉलिसीअंतर्गत वैयक्तिक माहितीचा गैरवापर (आयडेंटिटी थेफ्ट), ऑनलाईन छळ (सायबर-बुलिंग), ऑनलाईन खंडणी (सायबर एक्सटॉर्शन), मालवेअरची घुसखोरी, बँक खाते, क्रेडिट कार्ड आणि मोबाईल वॉलेट्स यांच्या बेकायदेशीर किंवा फसवणुकीद्वारे करण्यात आलेल्या गैरवापरातून झालेले आर्थिक नुकसान इत्यादी धोक्यांपासून संरक्षण मिळते. बहुतांश पॉलिसींमध्ये संरक्षण देण्यात आलेल्या धोक्यांसंदर्भातील कायदेशीर खर्च देखील मिळतो. काही पॉलिसीअंतर्गत हानिकारक प्रकाशने काढून टाकत डिजिटल प्रतिष्ठा पुर्ववत करण्यासाठी लागणाऱ्या सर्व खर्चावर देखील दावा करता येतो.

कशापासून संरक्षण मिळत नाही?

या वैयक्तिक सायबर सुरक्षा पॉलिसीअंतर्गत अप्रमाणिक आणि अयोग्य वर्तणूक, शारीरिक इजा/मालमत्तेचे नुकसान, अनावश्यक संवाद, बेकायदेशीर रीतीने माहिती गोळा करणे, अनैतिक/अश्लील सेवा इत्यादी गोष्टींना संरक्षण दिले जात नाही.

त्याचप्रमाणे, पॉलिसीचा कालावधी सुरू होण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या गोष्टी किंवा घडलेल्या प्रसंगांशी संबंधित दाव्यांनादेखील संरक्षण दिले जात नाही. याशिवाय, सहसा कोणत्याही सरकारी आदेशामुळे झालेली नुकसान भरपाईदेखील गृहीत धरली जात नाही.

वैयक्तिक सायबर विम्याचा खर्च किती येतो?

वैयक्तिक सायबर विम्यासाठी लागणाऱ्या हप्त्याचे दर सुमारे एक लाख रुपयांच्या विमा रकमेसाठी ६०० रुपयांपासून सुरू होतात.

1) एचडीएफसी अर्गोच्या E@Secure योजनेअंतर्गत 50 हजार ते एक कोटी रुपयांपर्यंत विम्याची रक्कम प्रदान केली जाते. यासाठी वार्षिक हप्त्याची सुरुवात 1 हजार 500 रुपयांपासून आहे.

2) बजाज आलियान्झच्या सायबर सेफ पॉलिसीअंतर्गत सुमारे 700 ते 9 हजार रुपयांपर्यंत हप्ता आकारला जातो. याअंतर्गत १ लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत विम्याची रक्कम प्रदान केली जाते.

3) आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सच्या ‘दि रिटेल सायबर लायबिलिटी इन्शुरन्स पॉलिसी’मध्ये प्रत्येक दिवसाला 6.5 रुपयांपासून 65 रुपयांपर्यंतचा हप्ता आकारला जातो. या मोबदल्यात 50 हजार रुपये ते एक कोटी रुपयांपर्यंतची विम्याची रक्कम प्रदान केली जाते.

पॉलिसी खरेदी करताना हे लक्षात ठेवा -

पॉलिसीअंतर्गत मिळणारे विमा संरक्षण आपल्या गरजांशी जुळवून पाहणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे, या पॉलिसीद्वारे आपल्या सर्व गरजा पुर्ण होतात की नाही याची खात्री करण्यासाठी कोणकोणत्या धोक्यांपासून संरक्षण मिळते तसेच कोणत्या धोक्यांपासून संरक्षण मिळत नाही हे तपासून पाहणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, ‘फॅमिली फ्लोटर’ पर्याय तपासून पाहावा ज्याअंतर्गत तुमचा जोडीदार तसेच मुलांनादेखील संरक्षण मिळते. यामध्ये किमान वयोमर्यादेची अटदेखील नसते.

खरेदी कशी करावी?

बहुतांश पॉलिसी या विमा कंपन्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाईन खरेदी करता येतात. आवश्यक कागदपत्रांसह पॉलिसी प्रस्ताव अर्ज भरुन सादर करावा. त्यानंतर, पॉलिसीची रचना केली जाईल आणि हे दस्ताऐवज तुमच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर पाठवले जाईल. याशिवाय, तुम्ही प्रत्यक्ष अर्ज करण्यासाठी या विमा कंपन्यांच्या नोंदणीकृत कार्यालयांना भेट देऊ शकता.

Last Updated : Jul 10, 2020, 12:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.