मेष - दिवसाची सुरवात द्विधा मनःस्थितीने होईल. इतरांशी वाद होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. आपल्या गोड बोलण्याने इतरांची मने जिंकू शकाल. आज आपली मनःस्थिती दोलायमान असल्याने शक्यतो नवीन कार्याची सुरवात करू नये. दुपार नंतर उत्साहित व्हाल. कुटुंबीयांशी सुसंवाद साधू शकाल. एखाद्या सहलीचे आयोजन यशस्वीपणे करू शकाल. आर्थिक नियोजन होऊ शकेल.
वृषभ - आजचा आपला दिवस मध्यम फलदायी आहे. दिवसाच्या सुरवातीस शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. कलेस वाव मिळेल. दुपार नंतर मात्र द्विधा मनःस्थिती झाल्याने आपण महत्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही.
मिथुन - आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. प्रकृती नरम गरम राहील. मन चिंताग्रस्त राहील. कुटुंबीयांशी मतभेद संभवतात. दुपार नंतर परिस्थितीत सुधारणा होईल. कामे होतील. उत्साह वाढेल. कौटुंबिक वातावरणात बदल होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
कर्क - आजचा दिवस व्यापारासाठी लाभदायी आहे. एखाद्या सहलीचा बेत आखू शकाल. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. डोळ्यांच्या विकाराचा त्रास सतावेल. कुटुंबातील व्यक्तींसाठी खर्च करावा लागेल. एखादा अपघात संभवतो.
सिंह - आजचा दिवस नवीन कार्यारंभास शुभ फलदायी आहे. हाती घेतलेली कामे पूर्ण होतील. मित्र व स्नेह्यांकडून भेटवस्तू मिळतील. नवीन ओळखींचा भविष्यात व्यापारासाठी लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबीय व मित्रांच्या सहवासात दिवस आनंदात जाईल. प्राप्तीत वाढ होईल. छोटा पण आनंददायी प्रवास होईल.
कन्या - आज आपणास आपल्या व्यवसायात धनलाभ होईल. दूरवरचे प्रवास करू शकाल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. परदेशस्थ स्नेह्यांकडून एखादी चांगली बातमी मिळेल. दुपार नंतर नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. दिवसभर मनात सुखा- समाधानाची भावना राहील. नोकरीत मिळालेल्या बढतीमुळे लाभ होईल. सामाजिक मान - सन्मान मिळाल्याने मन प्रसन्न होईल.
तूळ - आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. नवीन कार्यारंभात अडचणी येतील. कामाच्या व्यापामुळे मानसिक ताण वाढेल. प्रवासात त्रास संभवतो. दुपार नंतर मात्र परिस्थितीत सुधारणा होऊ लागेल. कार्यास गती येईल. परदेशस्थ नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळू शकेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. नवीन कार्य हाती घेऊ शकाल.
वृश्चिक - आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. वैवाहिक जीवनात सुख व समाधान प्राप्त होईल. आप्तांसह सामाजिक समारंभात सहभागी होऊ शकाल. एखादा प्रवास संभवतो. दुपार नंतर आरोग्य विषयक तक्रारी उदभवतील. आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. नवीन कार्यात अडचणी येतील. प्रवासात त्रास संभवतो.
धनू - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले नसतानाही प्रलंबित कामे आपण पूर्ण करू शकाल. आर्थिक नियोजन करण्यात यशस्वी व्हाल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. आप्तेष्टांशी जवळीक वाढेल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगता येईल. सामाजिक कार्यात यश प्राप्ती होईल. व्यवसाय वृद्धी होईल.
मकर - आज आपणास कष्टाचे अपेक्षित फळ मिळण्याची शक्यता धूसरच आहे. तरी सुद्धा कामावरील आपली निष्ठा कमी होणार नाही. इतरांशी सौहार्दपूर्ण संबंध राहतील. प्रकृती उत्तम राहण्यासाठी बाहेरचे पदार्थ खाणे टाळा. दुपार नंतर अपुरी कामे पूर्ण होतील. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. एखादा आर्थिक लाभ संभवतो. स्त्रियांना माहेर कडून एखादी चांगली बातमी मिळू शकेल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल.
कुंभ - विद्यार्थी, कलाकार व खेळाडू ह्यांच्यासाठी आजचा दिवस शुभ फलदायी आहे. पिता व शासनाकडून काही लाभ होऊ शकेल. खंबीर मनोबलामुळे कार्यपूर्ती होण्यात कोणतीही आडकाठी येणार नाही. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील, सबब शक्यतो बाहेरचे खाणे- पिणे टाळा. लेखन- वाचन यांत गोडी वाढेल. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल.
मीन - आजचा दिवस काल्पनिक विश्वात घालवाल. सृजनशीलतेला अचूक दिशा मिळेल. कुटुंबीय व मित्रांसह मेजवानीचा बेत ठरवू शकाल. दैनंदिन कामे आत्मविश्वास व एकाग्रचित्ताने पूर्ण करू शकाल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासाच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल आहे. संततीसाठी अनुकूल दिवस. पित्याकडून लाभ होईल.