नई दिल्ली : युनानी उपचारातील हिजामा थेरपी ही खूप उपायकारक आणि प्रभावी ठरली आहे. मोठ्या संख्येनी लोक आता या उपचारपद्धतीचा अवलंब करताना दिसत आहेत. या उपचारपद्धतीची सुरुवात प्राचीन युनानमध्ये झाली. या चिकित्सेला तिब्बे नबवी आणि सुन्नते नबवी असेही म्हटले जाते. १४०० वर्षांपूर्वी हजरत मोहम्मद यांच्या काळात ही उपचाराची पद्धत अवलंबली गेली होती. डॉक्टर अमीर अतिक अद्दिक सिद्दीकी यांनी युनानी औषध आणि उपचारपद्धतीबद्दल ईटीव्ही इंडियाशी विशेष संवाद साधला.
हिजामा थेरेपी सकारात्मक
अतीक सिद्दीकी या उपचाराबाबत म्हणाले, या युनानी उपचाराचा ३ दिवसांचा टप्पा असतो. यात पहिल्या टप्प्यातील उपचार म्हणजे विल्गीझा, दुसरा टप्पा म्हणजे विल्दवा आणि तिसरा उपचार तडबीर. तडबीरवर अनेक प्रकारच्या थेरपी आहेत. हिजामा थेरपी यामध्ये खूप फायदेशीर सिद्ध झाली आहे. बऱ्याच आजारांमध्ये हिजामा थेरपीचे चांगले परिणाम दिसून आले असल्याचे डॉ. सिद्दीकी म्हणाले. विशेषत:, केस गळतीच्या समस्येवर हिजामा थेरपीने खूप चांगले परिणाम दिले, असल्याचे ते म्हणाले. एका रुग्ण केसगळतीची समस्या घेऊन आला होता. त्याने केसगळती थांबवण्याकरता अनेक तेलांचा वापर केला, अनेक उपचार केले. मात्र, काहीच परिणाम झाला नाही. दरम्यान, त्याला कुणीतरी हिजामा थेरपीबाबत सांगितले. सुरुवातीला तो या थेरपीबाबत थोडा साशंक होता. मात्र, थेरपीच्या सत्रांनंतर आता तो समाधानी आहे, असे डॉ. सिद्दीकी यांनी सांगितले.
रोग प्रतिकारशक्ती बूस्टर म्हणून काम करणारी थेरपी
युनानी औषधोपचारातील हिजामा थेरपी जेथे आपणास विविध रोगांपासून मुक्त करते. त्याचबरोबर, ती कोरोना संसर्गातही रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याचे कार्य करीत आहे. कोरोना टाळण्यासाठी रोगास प्रतिरोधक शक्ती म्हणून आयुष उपचारातील विविध काढा आदी सर्व उत्पादनांचा वापर केला जात आहे. तर, हिजामा थेरपीचादेखील रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी देखील कार्यरत आहे, असे ते म्हणाले.