हैदराबाद - दोन वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याची घटना घडली होती. हैदराबाद पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत लगेचच संबंधित मुलाला शोधून काढले. मात्र, या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुलाला चंदरघाट भागातून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी तातडीने कारवाई केली आणि सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने आरोपी इब्राहिमला पकडण्यात यश आले. यानंतर गांधी रुग्णालयात मुलाची कोरोना चाचणी करण्यात आली, ज्यामध्ये त्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
पूर्व विभागाचे सहआयुक्त एम. रमेश रेड्डी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, या मुलाला कोरोना विषाणूचा संसर्ग कसा झाला याचा शोध सुरू आहे. मात्र, या मुलाच्या पोलीस आणि माध्यमांमधील अनेकजण संपर्कात आले होते. त्यांना अलग ठेवण्यासाठी पाठविण्यात आले आहे.