ETV Bharat / bharat

ईटीव्ही भारत विशेष : ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांच्या मूळावर? पालकांचेही होतायेत हाल

author img

By

Published : Jul 27, 2020, 5:33 PM IST

Updated : Jul 27, 2020, 8:07 PM IST

महामारीनंतर जगातील सर्व क्षेत्रांतील समीकरणे बदलली. याचा शिक्षण क्षेत्रावरदेखील मोठा परिणाम झाला. ऑनलाइन शिक्षणाने पाय रोवले; आणि शाळांतील फळ्यांची जागा 'इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स'ने घेतली. मात्र, अद्याप ही शिक्षण पद्धती सर्व वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सहज सोपी आणि आकलन वाढवणारी नसल्याचे समोर येते.

corona in bihar
अद्याप ऑनलाइन शिक्षण पद्धती सर्व वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सहज सोपी आणि आकलन वाढवणारी नसल्याचे समोर येते.

पूर्णिया (बिहार) - कोरोनानंतर जगभरातील शिक्षण आणि व्यापाराची समीकरणं बदलली आहेत. रोजगार, उद्योगधंदे, कारखाने यावर मोठा विपरीत परिणाम महामारीमुळे झाला. शिक्षण क्षेत्रात देखील अमूलाग्र बदल करण्याची गरज तज्ज्ञांना भासू लागली. परिस्थिती आणखी खालावल्यानंतर राज्यांनी ऑनलाइन वर्ग भरवण्याची सुरुवात केली. मात्र, ऑनलाइन सेवांची कनेक्टिव्हिटी आणि त्यांची उपलब्धता यामुळे अनेक विद्यार्थी आजही ऑनलाइन शिक्षणापासून वंचित आहेत. शहरात आणि ग्रामीण भागातील शैक्षणिक परिस्थितीत असलेला विरोधाभास यामुळे आणखी बळावला आहे. या प्रक्रियेतून जाताना सर्व विद्यार्थी आणि पालकांना मोठ्या बदलांना आणि अडचणींना समोरे जावे लागत आहे.

झोपड्यांमध्ये तेवत ठेवलीय शिक्षणाची ज्योत

जिल्ह्यातील पंचमुखी मंदिर परिसरात रोजंदारीवर उदर्निर्वाह करणारी ५० कुटुंबं वास्तव्य करतात. झोपड्यांमध्ये राहणाऱ्या या परिवारातील मुले सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. मुलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या या झोपड्यांमधील पालक आपल्या मुलांना शाळेत जाण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करत आहेत.

राजधानी पटनापासून ३७२ किमी दूर पुर्णिया जिल्ह्याच्या मुख्यालया नजीक सदर विधानसभा क्षेत्रात गरीब कुटुंबे राहतात. ज्यांची एकूण संख्या ३५०च्या जवळपास आहे. या वस्तीतील ७० टक्के मुलं शाळेत जातात. त्यातील निम्मी मुले खासगी शाळांमध्ये जात असून उर्वरित सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. या परिवारांमधील लोक सफाई कर्मचारी आहेत. जे शहरातील रुग्णालये, अन्य ऑफिसेसमध्ये काम करतात. त्यांना महिन्याला सात-ते आठ हजार पगार मिळतो. यामध्ये काही महिला सफाई कामगार देखील आहेत. त्यांना मुलांच्या शिक्षणासाठी वेळ देणे शक्य नसल्याने समस्या आणखी वाढल्या आहेत.

मुलांसमोर दुहेरी संकट

कोरोनामुळे बंद झालेल्या शाळा आणि ऑनलाइन शिक्षण पद्धतीने मुलांसमोरील अडचणी वाढवल्या आहेत. कारण दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या कुटुंबांसमोर मुलांच्या डिजीटल शिक्षणासाठी आवश्यक सामग्रीची पूर्तता करण्याची आर्थिक परिस्थिती नाही. मुलांना या तंत्रज्ञानाची सवय नसल्याने तांत्रिक अडचणी देखील येत आहेत. ऑनलाइची प्रक्रिया पालकांसोबतच विद्यार्थ्यांसाठीही आव्हानात्मक आहे.

ऑनलाइन शिक्षणासाठी भाड्याचे मोबाइल

ऑनलाइन अभ्यासासाठी आणि डिजीटल क्लासेससाठी आवश्यक आधुनिक मोबाइल नसल्याने पालकांनी विद्यार्थ्यांना भाडेतत्वावर मोबाइल आणून दिले आहेत. स्वत:कडे महागातील मोबाइल घेण्यासाठी पैसे नसल्याने तात्पुरता मार्ग पालकांनी निवडलाय. येणाऱ्या काळात परिस्थिती पूर्ववत होऊन शाळा सुरू होण्याची अपेक्षा त्यांना आहे.

खरं तर, मोबाईल दुरुस्ती दुकानात दुरुस्तीसाठी येणारे बरेच मोबाइल असतात. अनेकदा मालक त्यांचे मोबाइल पुन्हा नेत नाहीत. असेच मोबाइल या विद्यार्थ्यांना भाड्याने देण्यात येतात. यासाठी त्यांचे आधार कार्ड किंवा अन्य कागदपत्र गहाण ठेवण्यात येतात. तसेच पैसे देखील द्यावे लागतात. या सगळ्या प्रक्रिया पार पाडल्यानंतर मुलं ऑनलाइन शिक्षणांत सहभाग घेऊ शकत आहेत.

Last Updated : Jul 27, 2020, 8:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.