ETV Bharat / bharat

विगमध्ये लपवले तब्बल एक किलो सोने; कालिकत विमानतळावर तस्कराला अटक - टकलावरच्या विगमध्ये लपवले एक किलो सोने

एका बहाद्दराने टकलाचा आणि विगचा वापर सोने लपवण्यासाठी केल्याचे समोर आले आहे. या चतुर तस्कराला केरळातील कालिकत विमानतळावर अटक करण्यात आली आहे.

विगमध्ये लपवले एक किलो सोने
author img

By

Published : Oct 6, 2019, 5:30 PM IST

Updated : Oct 6, 2019, 6:25 PM IST

मलप्पुरम - लोक डोक्याला पडलेले टक्कल लपवण्यासाठी केसांच्या विगचा वापर करतात. मात्र, या टकलाचा आणि विगचा वापर सोने लपवण्यासाठी करण्याचा विचार कोणी क्वचितच केला असेल. असा प्रकार एका बहाद्दर तस्कराने केला असल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे पोलीसही चक्रावले आहेत. या चतुर तस्कराला केरळातील कालिकत विमानतळावर अटक करण्यात आली.

या तस्करला टक्कल वगैरे पडलेले नव्हते. तर, याने डोक्यावरच्या केसांच्या मध्यभागी टक्कल करून घेतले होते. या टकलावर केसांचा विग घालून त्याखाली बेमालूमपणे एक किलो सोने लपवण्यात आले होते. विमानतळावर ही हुशारी पकडली गेली. त्याला कस्टम अधिकाऱ्यांनी अटक केली. मोहम्मद रमीस, असे या तस्कराचे नाव आहे. तो एअर इंडिया एक्सप्रेस IX 348 या दुबईहून आलेल्या विमानाने भारतात पोहोचला. रमीस सोने तस्करांच्या मोठ्या टोळीचा सदस्य असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

Intro:Body:

टकलावरच्या विगमध्ये लपवले एक किलो सोने; कालिकत विमानतळावर तस्कराला अटक

मलप्पुरम - लोक डोक्याला पडलेले टक्कल लपवण्यासाठी केसांच्या विगचा वापर करतात. मात्र, या टकलाचा आणि विगचा वापर सोने लपवण्यासाठी करण्याचा विचार कोणी क्वचितच केला असेल. असा प्रकार एका हरहुन्नरी आणि कल्पक तस्कराने केला असल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे पोलिसही चक्रावले आहेत. या चतुर तस्कराला केरळातील कालिकत विमानतळावर अटक करण्यात आली. 

या तस्करला टक्कल वगैरे पडलेले नव्हते. तर, याने डोक्यावरच्या केसांच्या मध्यभागी टक्कल करून घेतले होते. या टकलावर केसांचा विग घालून त्याखाली बेमालूमपणे एक किलो सोने लपवण्यात आले होते. विमानतळावर ही हुशारी पकडली गेली. त्याला कस्टम अधिकाऱ्यांनी अटक केली. मोहम्मद रमीस असे या तस्कराचे नाव आहे. तो एअर इंडिया एक्सप्रेस IX 348 या दुबईहून आलेल्या विमानाने भारतात पोहोचला. या सोन्याची किंमत तब्बल २५ लाख रुपये आहे. रमीस सोने तस्करांच्या मोठ्या टोळीचा सदस्य असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

Conclusion:
Last Updated : Oct 6, 2019, 6:25 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.