ETV Bharat / bharat

काश्मीर : हा आहे श्रीनगरचा लाल चौक आणि घंटाघर

author img

By

Published : Oct 18, 2020, 5:17 PM IST

काश्मीरच्या सौंदर्याचे वर्णन करण्यासाठी मीडियाकडून डल झील (तलाव), शिकारा आणि हाऊसबोटींचा उल्लेख केला जातो. तर, लाल चौकाकडे सहसा काश्मीर खोऱ्यातील राजकीय अशांततेशी जोडले जाते. प्रसिद्ध बॉलीवूड चित्रपट 'हैदर'मधील काही उत्कृष्ट देखावे लाल चौक आणि त्याच्या क्लॉक टॉवरजवळ चित्रित केले गेले आहेत.

श्रीनगर लाल चौक आणि घंटाघर न्यूज
श्रीनगर लाल चौक आणि घंटाघर न्यूज

श्रीनगर - लाल चौकाला (रेड स्क्वेअर) श्रीनगर शहराचे हृदय म्हणतात. या ठिकाणाचे ऐतिहासिक महत्त्व आहे. त्याचा नामोल्लेख न करता काश्मीरचा 1947 नंतरचा इतिहास सांगताच येणार नाही. शहराच्या मध्यभागी असलेल्या ठिकाणाला गेल्या अनेक दशकांदरम्यान झालेल्या ऐतिहासिक घटनांमुळे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. यापैकी बर्‍याच घटनांना काश्मीरच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग मानले जाते.

रशियन समाजवादी क्रांतीमुळे प्रभावित आणि प्रेरित झालेल्या काही राजकीय कार्यकर्त्यांनी रशियन रेड स्क्वेअरच्या नावावरून याचे चौकाचे नाव ठेवले. लाल चौकाच्या मध्यभागी असलेल्या क्लॉक टॉवरलाही (घंटाघर) त्याचे राजकीय महत्त्व आहे. आता हा 'घड्याळ मनोरा' ऐतिहासिक लाल चौकाचे वैशिष्ट्य बनला आहे. याचे बांधकाम 1979 मध्ये झाले होते. एकेकाळी लोकप्रिय काश्मिरी नेते असलेल्या शेख मुहम्मद अब्दुल्ला यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे कौतुक केले होते. तेथेच हे बांधकाम करण्यात आले.

हेही वाचा - ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, स्टेल्थ डिस्ट्रॉयरचा वापर

दुर्दैवाने ऐतिहासिक लाल चौकाकडे सध्या प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या मनोऱ्यावरील चारही घड्याळे बिघडली आहेत. याची अनेकदा दुरुस्ती करण्यात आली आहे. तरीही, अद्याप याचे कार्य सदोष असून यात कधीच योग्य वेळ दाखवली जात नाही. काश्मीरच्या सौंदर्याचे वर्णन करण्यासाठी मीडियाकडून डल झील (तलाव), शिकारा आणि हौसबोटींचा उल्लेख केला जातो. तर, लाल चौकाकडे सहसा काश्मीर खोऱ्यातील राजकीय अशांततेशी जोडले जाते.

प्रसिद्ध बॉलीवूड चित्रपट 'हैदर'मधील काही उत्कृष्ट देखावे लाल चौक आणि त्याच्या क्लॉक टॉवरजवळ चित्रित केले गेले आहेत. काश्मिरात लवकरच सामान्य स्थिती येईल आणि असे झाल्यास लाल चौकदेखील हा बदल प्रतिबिंबित करेल, असे सध्याच्या सरकारकडून सांगितले जात आहे.

हेही वाचा - काश्मीरच्या त्राल येथे ग्रेनेड हल्ल्यात सीआरपीएफ अधिकारी जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.