श्रीनगर- येथील शाहील मांझूर या 23 वर्षाच्या युवकाच्या हातात जादू आहे. त्याचे हात काचेच्या कॅनवासवर चपखळ चालतात आणि वाळूच्या कणांमधून चित्तवेधक प्रतिमा तयार होतात.अशाच प्रकारे त्याने वाळुचा वापर करुन काश्मीरचा नकाशा तयार केला आहे. त्यानंतर ते संपूर्णपणे चिनार पानेमध्ये रुपांतरित झाले.
ईटीव्ही भारतशी बोलताना मांझूर म्हणाला, लहानपणापासून मला कलेमध्ये रस होता. अलीकडे मला काहीतरी वेगळे करायचे होते, म्हणून मी वाळूचा वापर करून कला करण्याचा प्रयत्न करतो. यामुळे मी काश्मीर चित्रित केले.
शाहील मांझूर हा मेकॅनिकल अभियंता आहे. त्याने यु ट्युब वर व्हिडिओ पाहुन कला कमावली आहे.पर्यटन विभाग आणि अधिकार्यांना आग्रह करताना मांझूर म्हणाला "शासनाने तरूणांना अशा प्लॅटफॉर्म पुरविले पाहिजेत, कारण कश्मीरमधील लोकही त्यांची प्रतिभा दाखवू इच्छित आहेत." संसाधनांच्या अनुपलब्धतेमुळे, मांझूरने आपल्या वडिलांच्या मदतीने कलेसाठी स्वत: ची उपकरणे तयार केली.