नवी दिल्ली - कर्नाटकातील बंडखोर आमदारांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला. 'कर्नाटक विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांना आमदारांच्या राजीनाम्यांवर तातडीने किंवा विशिष्ट कालावधीत निर्णय देण्याची सक्ती करता येणार नाही, आणि विश्वासदर्शक ठरावावेळी उपस्थित राहणे बंडखोर आमदारांना बंधनकारक करता येणार नाही, असा निकाल न्यायालयाने दिला.
LIVE UPDATE :
- आम्ही सर्वजण आमच्या निर्णयावर ठाम आहोत. विश्वासदर्शक ठरावासाठी विधानसभेत जाण्याचा प्रश्नच येत नाही - बंडखोर काँग्रेस आणि जेडीएस आमदार.
- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.
- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देण्यास मुख्यमंत्री कुमारस्वामींचा नकार
- राज्यघटनेच्या किंवा लोकसेवकांच्या विरोधात जाणारा निर्णय घेणार नाही - विधानसभा अध्यक्ष, के. आर रमेश कुमार
- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. कुमारस्वामी सरकारला बहुमत नसल्याने त्यांनी उद्या राजीनामा द्यावा. हा राज्यघटनेचा आणि लोकशाहीचा विजय आहे - बी. एस येदीयुरप्पा, भाजप.