बंगळुरू - कर्नाटकात राजकीय गुंता वाढल्यामुळे कुमारस्वामी कृपा गेस्ट हाऊसमध्ये महत्त्वाची बैठक सुरू आहे. आणखी काही आमदार राजीनामा देण्याची शक्यता निर्माण झाल्याने सत्ताधारी नेत्यांना घाम फुटला आहे. एका बाजूला याआधी राजीनामा दिलेल्या आमदारांचे मन वळवण्यात यश आलेले नाही. तर दुसऱ्या बाजूला दोन्ही सत्ताधारी पक्षांमधील राजीनामा देणाऱ्या आमदारांची संख्या वाढू शकते. १६ आमदारांनी आधीच राजीनामा दिला आहे. आता ही संख्या ३८ वर जाऊ शकते.
हे आमदार राजीनामा देण्याची शक्यता -
सौम्या रेड्डी (जयानगर), अंजली निंबाळकर (कनापूर), आनंद नामागौडा (जामखंडी), शिवाण्णा (अनेकल), गणेश हुक्केरी (चिकोडी), महान्तेश कजालगी (बैलाहोगोंडा)
या कारणाने कुमारस्वामी कृपा गेस्ट हाऊस येथे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू आहे. गुलाम नबी आझाद, के. के. वेणुगोपाल आणि मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यासह आणखी काही वरिष्ठ नेते उपस्थित आहेत.