ETV Bharat / bharat

कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेस -जेडीएसच्या १७ आमदारांना ठरवले अपात्र

कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेस- जेडीएसच्या १७ बंडखोर आमदांराना अपात्र ठरवले आहे.

के. आर रमेशकुमार
author img

By

Published : Jul 28, 2019, 12:14 PM IST

Updated : Jul 28, 2019, 3:55 PM IST

बंगळुरु - कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेस- जेडीएसच्या १४ बंडखोर आमदांराना अपात्र ठरवले आहे. आतापर्यंत एकूण १७ आमदारांना अपात्र ठरवण्यात आले आहे. १५ व्या विधानसभेचे विसर्जन होईपर्यंत अपात्र आमदारांना निवडणूक लढवता येणार नाही, असे अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपचे सरकारही अडचणीत येण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री बी. एस येडीयुरप्पा यांनी उद्या (सोमवारी) विश्वासदर्शक ठराव मांडण्याची विनंती केली असल्याची माहिती अध्यक्ष रमेशकुमार यांनी दिली. मागील काही दिवासांपासून राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडींमुळे नैराश्येच्या गर्तेत सापडलो असल्याचे रमेश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

अपात्र ठरवण्यात आलेल्या काँग्रेसच्या १४ आमदारांची नावे

मुनीरत्ना, सुधाकर, एम. टी. बी. नागराज, रोशन बेग, भारती बसवराज, प्रताप गौड, सोमशेखर, विश्वनाथ, बी. सी. पाटील , शिवराम हेब्बर, नारायन गौडा, गोपलाई, आनंद सिंह, श्रीमंत पाटील.

शुक्रवारी अपात्र ठरवलेले काँग्रस जेडीएसचे आमदार

रमेश जरकाईहोली, महेश कुमातल्ली, आर. शंकर

काँग्रेस-जेडीएसचे सरकार आमदारांच्या राजीनामा नाट्यानंतर कोसळले. विश्वासदर्शक ठरावात काँग्रेसला ९९ मते मिळाली, तर भाजपच्या बाजूने १०५ आमदारांनी कौल दिला. त्यामुळे मुख्यमंत्री कुमारस्वामींना खुर्चीवरुन पायउतार व्हावे लागले आहे.

विश्वासदर्शक ठरावानंतर बी. एस येडीयुरप्पा यांनी सरकार स्थापनेसाठी राज्यपाल वजुभाई वाला यांच्यापुढे प्रस्ताव ठेवला. त्यानुसार येडीयुरप्पा यांनी मुख्यंमत्रीपदाची शपथ घेतली. आता १७ आमदारांना अपात्र ठरवल्यामुळे भाजप सरकार अडचणीत आले आहे. उद्या विधानसभेत विश्वासदर्शक ठराव झाला तर भाजप सरकार अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

१४ महिन्यांच्या काँग्रेस-जेडीएस सरकारच्या काळात भाजपने आमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचे कुमारस्वामी यांनी आरोप केले आहेत.

Intro:Body:

national

Conclusion:
Last Updated : Jul 28, 2019, 3:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.