ETV Bharat / bharat

तुम्ही अटलजींच ऐकलं नाही; आमचं काय ऐकणार, कपील सिब्बलांचा भाजपला टोला

२००२ साली गुजरात दंगली झाल्यानंतर राजधर्म पाळण्याचा सल्ला अटलबिहारी वाजपेयी यांनी नरेंद्र मोदींना दिला होता. त्याची आठवण करून देत सिब्बल यांनी भाजपवर टीका केली आहे.

kapil sibbal
कपील सिब्बल संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Feb 29, 2020, 2:48 PM IST

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील हिंसाचारानंतर काँग्रेसने भाजपला राजधर्माचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. यावरून भाजप आणि काँग्रेसमधील नेत्यांमध्ये जुंपल्याची पाहायला मिळत आहे. सोनिया गांधी आणि काँग्रेस नेत्यांनी भाजपला राजधर्म शिकवू नये असे कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हणत काँग्रेसला फटकारले होते. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपील सिब्बल यांनी या वादत उडी घेतली आहे. त्यांनी ट्विटवरून रविशंकर प्रसाद यांना उत्तर दिले आहे.

  • Law Minister to Congress :

    “ Please don’t preach us Rajdharma “

    How can we Mr. Minister ?

    When you did not listen to Vajpayeeji in Gujarat why would you listen to us !

    Listening , learning and obeying Rajdharma not one of your Government’s strong points !

    — Kapil Sibal (@KapilSibal) February 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'आम्ही तुम्हाला कसा रामधर्म शिकवणार? तुम्ही गुजरातमध्ये वाजपेयीजींचा सल्ला ऐकला नाही. आमचे काय ऐकणार? दुसऱ्याचे ऐकून घेणं, शिकणं आणि राजधर्माचं पालन करणं हे गुण तुमच्या सरकारमध्ये नाहीत', असा टोला कपील सिब्बल यांनी भाजप आणि रविशंकर प्रसाद यांना लगावला आहे.

२००२ साली गुजरात दंगली झाल्यानंतर राजधर्म पाळण्याचा सल्ला अटलबिहारी वाजपेयी यांनी नरेंद्र मोदींना दिला होता. त्याची आठवण करून देत सिब्बल यांनी भाजपवर टीका केली आहे.

दिल्ली हिंसाचारानंतर काँग्रेसने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि केंद्र सरकारवर टीका केली होती. काँग्रेस प्रतिनिधी मंडळाने राष्ट्रपतींना निवेदन दिले होते. तसेच भाजपला राजधर्म पाळण्याची विनंती राष्ट्रपतींकडे केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसने केली होती. तर दिल्ली हिंसाचाराची घटना देशाला लाजवणारी घटना असल्याचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.