ETV Bharat / bharat

काँग्रेसला स्वबळावर बहुमत नाही, निवडणुकांच्या मध्यातच कपिल सिब्बल यांचे वक्तव्य - BJP

लोकसभा निवडणुकांच्या मध्यातच काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाला स्वतःच्या बळावर बहुमत मिळणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पक्षासह राजकीय पटलावर खळबळ उडाली आहे.

Kapil Sibal
author img

By

Published : May 5, 2019, 11:28 PM IST

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला बहुमत मिळणार नाही, असे धक्कादायक वक्तव्य पक्षाचेच ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केले आहे. मात्र, भाजपलाही १६० पेक्षा जास्त जागा जिंकता येणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे. नवी दिल्ली येथे एका मुलाखतीत बोलत होते.

लोकसभा निवडणुकांच्या मध्यातच काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाला स्वतःच्या बळावर बहुमत मिळणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पक्षासह राजकीय पटलावर खळबळ उडाली आहे. मात्र भाजपला यावेळी मोठा फटका बसणार, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

यावेळी युपीए सरकार स्थापन करेल, असे सिब्बल यांनी म्हटले आहे. मात्र, युपीएचा पंतप्रधान पदाचा दावेदार राहुल गांधी असतील का ? या प्रश्नावर त्यांनी उत्तर देणे टाळले. काँग्रेसला २७२ जागा मिळाल्या तर प्रश्नच उरत नाही. मात्र, कमी जागा मिळाल्यास राहुल गांधीं बद्दल सांगता येत नाही, असे ते म्हणाले.

सपा-बसपावर काय म्हणाले सिब्बल ?

आम्हाला माहिती आहे, की यावेळी आपल्याला बहुमत मिळणार नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत २७२ जागा जिंकू शकत नाही. यामध्ये थोडीही शंका नाही, असेही त्यांनी म्हटले. त्यांनी दावा केला आहे, की निवडणुकीनंतर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष महागठबंधनमध्ये येणार. तर, पंतप्रधान कोण होईल हे आघाडीच ठरवणार, असेही ते म्हणाले.

Intro:Body:

National NEWS 04

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.