ETV Bharat / bharat

कानपूर चकमक: राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून विरोधी पक्षांचा योगी सरकारवर हल्लाबोल - उत्तरप्रदेश आठ पोलीस शहीद

कानपूरमध्ये विकास दुबे या गुंडाला पकडण्यासाठी पोलीस गेले असता गुंडांनी पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये पोलीस उपअधीक्षकासह 8 जण हुतात्मा झाले. यानंतर उत्तर प्रदेश राज्यातील राजकीय वातावरण पेटले असून विरोधी पक्षांनी योगी सरकारवर हल्ला केला.

कानपूर चकमक
कानपूर चकमक
author img

By

Published : Jul 3, 2020, 2:48 PM IST

लखनऊ - कानपूरमध्ये एका गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गोळीबार झाला. या चकमकीत आठ पोलीस कर्मचाऱ्यांना वीरमरण आले. या घटनेनंतर उत्तर प्रदेश राज्यातील राजकीय वातावर पेटले असून विरोधी पक्षांनी योगी सरकारवर हल्लाबोल केला. राज्यामध्ये कोणीच सुरक्षित नसल्याचे विरोधी पक्षांनी म्हटले आहे. काँग्रेस नेत्यांसह समाजवादी पक्षाने सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

कानपूरमध्ये विकास दुबे या गुंडाला पकडण्यासाठी पोलीस गेले असता गुंडांनी पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये पोलीस उपअधीक्षकासह 8 जण हुतात्मा झाले. आज(शुक्रवार) ही घटना घडली. सात इतर पोलीस कर्मचारी जखमीही झाले आहेत. या घटनेनंतर आरोपींना पकडण्यासाठी मोठी शोधमोहिम राबवण्यात येत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तर विरोधी पक्ष कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून आक्रमक झाले आहेत.

उत्तर प्रदेशातील गुंडागिरीचे आणखी एक उदाहरण

आठ पोलिसांची हत्या झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. उत्तर प्रदेशातील गुंडागिरीचे आणखी एक उदाहरण. जेथे पोलिसच सुरक्षित नाहीत, तेथे नागरिक कसे सुरक्षित असतील, असे राहुल गांधी म्हणाले. प्राण गमावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या.

सर्वसामान्य व्यक्तीपासून ते पोलीस कोणीच राज्यात सुरक्षित नाही

गुंडांना पकडण्यासाठी गेलेले आठ पोलीस शहीद झाले. शहीदांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करते. उत्तर प्रदेशात कायदा सुव्यव्यवस्था अतिशय खराब झाली आहे. गुन्हेगारांना कोणाचीही भीती राहिली नाही. सर्वसामान्य व्यक्तीपासून ते पोलीस कोणीच राज्यात सुरक्षित नाही, असे काँग्रेस नेत्या आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या सचिव प्रियंका गांधी म्हणाल्या.

कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. कसलीही हलगर्जीपणा न करता आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी प्रियंका गांधींनी केली.

उत्तर प्रदेश बनलेयं 'हत्या प्रदेश'- समाजवादी पक्ष

राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून समाजवादी पक्षानेही योगी सरकारवर कठोर शब्दांत टीका केली आहे. उत्तर प्रदेश आता 'हत्या प्रदेश' झाला आहे. 'रोगी' सरकारच्या जंगलराजमध्ये राज्य हत्या प्रदेश बनले आहे. राजकारण्यांकडून संरक्षण असणाऱ्या गुंडांनी पोलिसांची हत्या केली, असे समाजवादी पक्षाने ट्विटरवर म्हटले आहे.

उत्तरप्रदेशातील ही गुन्हेगारीची घटना सर्वात जास्त लज्जास्पद आहे. सत्ताधारी आणि गुन्हेगारांत असलेल्या लागेबांध्यांची किंमत कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना मोजावी लागली. आरोपींना लवकरात लवकर अटक करून राज्य सरकारला उघडं पाडायला हवं, असे समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी म्हटले. ही घटना दुर्देवी असल्याचे म्हणत त्यांनी शहीद पोलिसांना श्रद्धांजली वाहीली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.