ETV Bharat / bharat

कोडियालातला 'कांची साडी' उद्योग कोरोनामुळे संकटात, 10 हजार लोकांच्या रोजगाराचा प्रश्न - कर्नाटक कांची साडी उद्योग कोरोनाचे संकट

कोडियालामध्ये जवळजवळ 600 हातमागांवर प्रसिद्ध कांची साड्यांचं विणकाम होत होतं आणि इथं 1500 हून अधिक लोकांना यातून थेटपणे रोजगार मिळत होता. तर, तब्बल 10 हजार लोक या उद्योगातून अप्रत्यक्षपणे अर्थार्जन करत होते. या साड्या त्यांच्या गुणवत्तेमुळे खूप प्रसिद्ध आहेत. त्या भारतातल्या अन्य राज्यांतही पाठवल्या जातात आणि त्यांची निर्यातही होते. विणकरांना कोरोनामुळे वाहतुकीच्या साधनांच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे.

कांची साडी न्यूज
कांची साडी न्यूज
author img

By

Published : Sep 20, 2020, 6:08 AM IST

मंड्या (कर्नाटक) - कोरोनामुळं वेगानं चालणारेही बरेच व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. या महामारीच्या तडाख्यामुळं लहानापासून मोठ्यापर्यंत कोणताच उद्योग मजबूत स्थितीत दिसत नाही. अशांपैकीच एक आहे कर्नाटकचा प्रसिद्ध कांची साडी उद्योग. कोरोनामुळं हा उद्योग सध्या संकटात सापडला आहे.

म्हैसूर जिल्ह्याच्या राजे-रजवाड्यांनी मंड्या जिल्ह्यात रेशीम व्यवसाय करणाऱ्यांना प्रोत्साहन दिलं. सुरुवातीला कोडियालातल्या लोकांनी त्यांच्या शेतांमध्ये रेशीमकिडे पाळण्यास सुरुवात केली होती. तेव्हा लोकांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशानं इथल्या राजांनी किड्यांपासून मिळणाऱ्या रेशमाचं कापड तयार करण्याचा निर्णय घेतला. यासाठी मंड्या जिल्ह्यातल्या पाच ठिकाणांची निवड करण्यात आली. यातील एक ठिकाण होतं कोडियाला. श्री रंगापट्टणच्या कोडियालातले लोक तेव्हापासून 'कांची सिल्क'च्या साड्या तयार करत आहेत.

कोडियालातला 'कांची साडी' उद्योग कोरोनामुळे संकटात

हेही वाचा - तिनं जपली आवड... अन् बनली मुस्लीम समाजातील पहिली महिला 'यक्षगान कलाकार'

कोडियालामध्ये जवळजवळ 600 हातमागांवर प्रसिद्ध कांची साड्यांचं विणकाम होत होते आणि येथे 1500 हून अधिक लोकांना यातून थेटपणे रोजगार मिळत होता. तर, तब्बल 10 हजार लोक या उद्योगातून अप्रत्यक्षपणे अर्थार्जन करत होते. या साड्या त्यांच्या गुणवत्तेमुळे खूप प्रसिद्ध आहेत. त्या भारतातल्या अन्य राज्यांतही पाठवल्या जातात आणि त्यांची निर्यातही होते. विणकरांना कोरोनामुळे वाहतुकीच्या साधनांच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्यांना व्यवसायात मोठा तोटा सहन करावा लागत आहे. या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यामागे म्हैसूरच्या राजांचा अर्थव्यवस्थेचा विकास करणे हा एकमेव उद्देश होता. त्यांनी कापड उद्योगाला चालना दिल्यामुळे लोक स्वावलंबी होण्यास मदत झाली. मात्र, महामारीमुळे संपूर्ण कांची साडी उद्योगाचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा - ब्रिटिशकालीन जलविद्युत प्रकल्प ठरतोय भारतीय विद्युत ऊर्जा इतिहासाचा गौरवशाली वारसा

मालक आणि कामगारांना व्यापारात अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. ते त्यांचा कपडे आणि हातमागाचा व्यवसाय बंद करण्याच्या स्थितीत येऊन पोहोचलेत. त्यामुळे कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने हातमाग उद्योगाला नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. मात्र, अद्याप ही रक्कम नोकरी देणाऱ्यांपर्यंत आणि कांची साड्या बनवणाऱ्यांच्या हातात पोहोचली नाही आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.