ETV Bharat / bharat

कमलनाथ सरकार धोक्यात? मध्य प्रदेशमध्ये भाजपचे 'ऑपरेशन लोटस' सुरू - मध्य प्रदेशात घोडेबाजार

या ऑफरनुसार, 100 कोटी चार हप्त्यांमध्ये दिले जाणार आहेत. हे सरकार पाडण्यात सहकार्य करणाऱ्यांना कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद दिले जाईल, असे आश्वासनही देण्यात आल्याचे राय यांनी सांगितले.

mp cm kamalnath file pic
कमलनाथ संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 4, 2020, 10:38 AM IST

Updated : Mar 4, 2020, 7:19 PM IST

इंदूर - आरटीआय कार्यकर्ते आनंद राय यांनी मध्य प्रदेशच्या राजकारणात घोडेबाजार सुरू झाल्याचा आरोप केला आहे. भाजपकडून काँग्रेसच्या आमदारांना 100 कोटींची ऑफर दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजप सध्याच्या काँग्रेस सरकारमधील आमदारांना खरेदी करून सरकार पाडण्याचा डाव करत असल्याचे राय यांनी म्हटले आहे. यामुळे मध्य प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

काँग्रेस आमदारांना 100 कोटींची ऑफर?

या ऑफरनुसार, 100 कोटी चार हप्त्यांमध्ये दिले जाणार आहेत. राय यांच्या सांगण्यानुसार, दोन ते तीन आमदार भाजपच्या संपर्कात होते. मागील एका वर्षांपासून भाजप कमलनाथ सरकार पाडण्याच्या प्रयत्नात आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांची यात महत्त्वाची भूमिका आहे, असे त्यांनी म्हटले आहे. हे सरकार पाडण्यात सहकार्य करणाऱ्यांना कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद दिले जाईल, असे आश्वासनही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Last Updated : Mar 4, 2020, 7:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.