ETV Bharat / bharat

...तर 24 तासांत 'कमलनाथ' सरकार पाडू, भाजप नेत्याची धमकी

author img

By

Published : Jul 24, 2019, 7:11 PM IST

आमच्या पक्षातील क्रमांक 1 आणि 2 च्या नेतृत्वाने आदेश दिल्यास, पुढील २४ तासांत मध्य प्रदेशातील काँग्रेसचे कमलनाथ सरकार राहणार नाही, असे वक्तव्य भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते गोपाल भार्गव यांनी विधानसभेत केले.

....तर 24 तासांत 'कमलनाथ' सरकार पाडू, भाजप नेत्याची धमकी

भोपाळ - आमच्या पक्षातील क्रमांक 1 आणि 2 च्या नेतृत्वाने आदेश दिल्यास, पुढील २४ तासात मध्य प्रदेशातील काँग्रेसचे कमलनाथ सरकार राहणार नाही, असे वक्तव्य भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते गोपाल भार्गव यांनी विधानसभेत केले. कर्नाटकातील राजकीय नाट्यानंतर विधानसभेत विश्वासदर्शक ठराव घेण्यात आला. त्यामध्ये काँग्रेस-जेडीएस सरकार बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरले. त्यानंतर आता भाजपने मध्य प्रदेशातील 'कमलनाथ' सरकार पाडण्याची धमकी दिली. भार्गव यांच्या या विधानाने राजकीय गोटात एकच खळबळ माजली आहे.

  • BJP leader and Madhya Pradesh Leader of Opposition Gopal Bhargav in Assembly: Hamare oopar wale number 1 ya number 2 ka aadesh hua to 24 ghante bhi aapki sarkar nahi chalegi (file pic) pic.twitter.com/e9oz26LTnW

    — ANI (@ANI) July 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भार्गव यांच्या या विधानाला मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'तुम्हाला वाटत असेल तर अविश्वास ठराव मांडा, त्यासाठी सरकार पूर्णपणे तयार आहे', असे थेट आव्हान कमलनाथ यांनी दिले आहे.

त्यानंतर सरकार येणार-जाणार त्यावरून तुम्ही चिंतेत राहू नका, सरकार आहे तेवढे दिवस खूश रहा, असे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते शिवराजसिंह यांनी सांगितले. त्यामुळे मध्य प्रदेशातही कर्नाटकप्रमाणे राजकीय नाट्य रंगण्याची चिन्हे आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.