नवी दिल्ली - ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राजीनामा दिल्यानंतर मध्यप्रदेशातील सरकार अखेर कोसळले आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या राजीनाम्यावर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी टि्वट केले आहे. आज जनतेचा आणि सत्याचा विजय झाला, असे ते म्हणाले.
-
मध्य प्रदेश में आज जनता की जीत हुई है। मेरा सदैव ये मानना रहा है कि राजनीति जनसेवा का माध्यम होना चाहिए, लेकिन प्रदेश सरकार इस रास्ते से भटक गई थी। सच्चाई की फिर विजय हुई है। सत्यमेवजयते।
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) March 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">मध्य प्रदेश में आज जनता की जीत हुई है। मेरा सदैव ये मानना रहा है कि राजनीति जनसेवा का माध्यम होना चाहिए, लेकिन प्रदेश सरकार इस रास्ते से भटक गई थी। सच्चाई की फिर विजय हुई है। सत्यमेवजयते।
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) March 20, 2020मध्य प्रदेश में आज जनता की जीत हुई है। मेरा सदैव ये मानना रहा है कि राजनीति जनसेवा का माध्यम होना चाहिए, लेकिन प्रदेश सरकार इस रास्ते से भटक गई थी। सच्चाई की फिर विजय हुई है। सत्यमेवजयते।
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) March 20, 2020
'मध्य प्रदेशमध्ये आज जनतेचा विजय झाला आहे. राजकारण हे लोकांच्या सेवेचे माध्यम असल्याचं माझं मत आहे. मात्र, मध्य प्रदेश सरकार रस्ता चुकले होते. आज पुन्हा सत्याचा विजय झाला आहे. सत्यमेव जयते!' असे टि्वट ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले आहे.
काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाजप प्रवेशानंतर मध्य प्रदेशमधील राजकीय समीकरणे वेगाने बदलली. आज(शुक्रवारी) बहुमत चाचणी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, त्याआधीच कमलनाथ यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. तर भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आहे.