गांधीनगर - जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. शासन आणि प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. देशात लॉकडाऊन करण्यात आले असून सर्व धार्मिक स्थळेही बंद ठेवण्यात आली आहेत. तरीही दिल्लीतील 'मरकज'सारख्या घटना समोर आल्या आहेत. या दरम्यान गुजरातच्या जुनागड येथील चर्चमधील एका फादरने मात्र, सर्वांसमोर एक उदाहरण ठेवले आहे.
हेही वाचा - CORONA VIRUS : अंधारातून प्रकाशाकडे..5 एप्रिलला रात्री 9 वाजता लाईट बंद करून घरोघरी दिवे लावा, मोदींचे आवाहन
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'सोशल डिस्टन्सिंग' हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे गर्दी होणारी धार्मिक स्थळेही बंद ठेवण्यात आली. मात्र, प्रत्येक धर्माच्या नियमाप्रमाणे पूजा करण्याची परवानगी देण्यात आली. चर्चमध्येही प्रार्थनेचे आयोजन केले जाते. मात्र, लॉकडाऊनमुळे लोक प्रार्थनेला हजर राहू शकत नाहीत. फादर विनोद यांनी प्रार्थनेला नियमीत हजर असणाऱ्या लोकांच्या नावाच्या चिठ्ठ्या बाकांवर लावून प्रार्थना आयोजित केली.