ETV Bharat / bharat

जागते रहो : सायबर गुन्ह्यांसाठी 'ज्यूस जॅकिंग' हा (हॅकर्सचा) नवीन मार्ग - सायबर गुन्हा

सायबर क्राईमच्या शब्दसंग्रहात आणखी एक नवीन संज्ञा जोडली गेली आहे. जिचे नाव आहे 'ज्यूस जॅकिंग.' बरेचजण याला बळी पडले आहेत मात्र यापासून वाचण्यासाठी अशा ठिकाणी चार्जिंग करताना जागरूक राहण्याशिवाय दुसरी कोणतीही खबरदारी घेतली जात नाही. जेंव्हापासून मोबाईल फोनची चार्जिंग केबल सोयीसाठी डेटा केबलमध्ये रूपांरित केतली गेली आहे, तेव्हापासून दुसऱ्याच्या फोनमधील खासगी डेटा हॅक करण्यासाठी ज्यूस जॅकिंग हा सोपा मार्ग सापडला आहे.

cyber crime  juice jacking  cybercriminals  hackers  USB ports  Sandeep Patil  Bengaluru  IT Capital  personal data  ज्यूस जॅकिंग  सायबर गुन्हा  ज्यूस जॅकिंग म्हणजे काय?
जागते रहो : सायबर गुन्ह्यांसाठी 'ज्यूस जॅकिंग' हा (हॅकर्सचा) नवीन मार्ग
author img

By

Published : Jun 20, 2020, 10:22 AM IST

Updated : Jun 22, 2020, 2:01 PM IST

नवी दिल्ली - सार्वजनिक ठिकाणी आपला फोन चार्ज करण्यापासून सावध रहा. सार्वजनिक ठिकाणी देण्यात आलेल्या विनामूल्य चार्जिंग पॉईंट्सच्या माध्यमातून आपला डेटा चोरण्याचे काम हॅकर्स करीत आहेत. चार्जिंग करण्यासाठी सोयीचे साधन म्हणून मानले जाणारे चार्जिंग पॉईंट्स आता मोबाईल फोनमधील खासगी डेटा चोरी करत असल्याने लोकांसाठी एक नवीन समस्या बनत आहे.

cyber crime  juice jacking  cybercriminals  hackers  USB ports  Sandeep Patil  Bengaluru  IT Capital  personal data  ज्यूस जॅकिंग  सायबर गुन्हा  ज्यूस जॅकिंग म्हणजे काय?
जागते रहो : सायबर गुन्ह्यांसाठी 'ज्यूस जॅकिंग' हा (हॅकर्सचा) नवीन मार्ग

सायबर क्राईमच्या शब्दसंग्रहात आणखी एक नवीन संज्ञा जोडली गेली आहे. जिचे नाव आहे 'ज्यूस जॅकिंग.' बरेचजण याला बळी पडले आहेत. मा, यापासून वाचण्यासाठी अशा ठिकाणी चार्जिंग करताना जागरूक राहण्याशिवाय दुसरी कोणतीही खबरदारी घेतली जात नाही. जेंव्हापासून मोबाईल फोनची चार्जिंग केबल सोयीसाठी डेटा केबलमध्ये रूपांरित केली गेली आहे, तेव्हापासून दुसऱ्याच्या फोनमधील खासगी डेटा हॅक करण्यासाठी ज्यूस जॅकिंग हा सोपा मार्ग सापडला आहे.

विनामूल्य चार्जिंग पॉईंट्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या ठिकाणी, म्हणजे, विमानतळ, बस स्थानके, रेल्वे स्थानक, उद्याने आणि मॉल्ससारख्या सार्वजनिक ठिकाणांना हॅकर्स लक्ष्य करतात. चार्जिंग तसेच प्रीप्रोग्राम्ड डेटा केबलच्या (डेटा देवाणघेवाण करण्याची सोया असलेली केबल) माध्यमातून व्यक्तीचे तपशील हस्तांतरित केले जातात. बँकिंगसाठी वापरल्या जाणारे सांकेतिक शब्द / पासवर्ड, सोशल मीडिया प्रोफाइल, वैयक्तिक डेटा आणि छायाचित्रे इत्यादी माहिती मिळविणे हॅकर्सला सहज शक्य होते. पासवर्ड बदलून किंवा रीसेट करून किंवा डिव्हाइसला किंवा फोनला लॉक करून किंवा वैयक्तिक डेटा मिळवून ब्लॅकमेल केले जाऊ शकते.

गुन्हे अन्वेषण विभागाचे सहआयुक्त संदीप पाटील म्हणाले की, आयटी राजधानी म्हणून ओळख असलेल्या बंगळुरू शहरात आणि राज्यात सायबर गुन्हे वाढत आहेत, “आम्ही स्थानिक पोलिस स्टेशन, सीसीबी किंवा सायबर-क्राइम स्टेशनच्या माध्यमातून चार्जिंग पॉईंट्स उपलब्ध असलेल्या सार्वजनिक ठिकाणांची तपासणी करत आहोत. अशा चार्जिंग पॉईंट्सवरून हा गुन्हा केला जाऊ शकतो याची लोकांना माहिती झाली की ते आवश्यक ती खबरदारी बाळगतील.

वैयक्तिक डेटाची चोरी करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या अनेक पद्धतींपैकी ज्यूस जॅकिंग ही एक आहे. यापासून वाचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे याविषयीची माहिती असणे किंवा आवश्यक ती काळजी घेणे.

ज्यूस जॅकिंग म्हणजे काय?

  • चार्जिंग पोर्टद्वारे तुमच्या मोबाइल फोनवरून तुमचा वैयक्तिक डेटा चोरण्यासाठी हॅकर्सकडून वापरली जाणारी ही एक पद्धत आहे.
  • प्रीप्रोग्राम्ड डेटा केबलच्या साह्याने तुमच्या फोनमध्ये मालवेअर सॉफ्टवेअर किंवा व्हायरसच सोडण्यात येतो.
  • चार्जिंग पोर्टवर फोन चार्जिंग करता असताना संशयदेखील वाटणार नाही, अशा व्यक्तीकडून डेटाची चोरी करण्यात येते.
  • मुख्यत: विमानतळ, बसस्थानक, रेल्वे स्थानक, मॉल्स आणि उद्याने यांसारख्या विनामूल्य चार्जिंग पॉईंट्सवर डेटाची मोठ्या प्रमाणात चोरी करण्यात येते.
  • बँकिंग आणि सोशल मीडिया खात्यांसाठी वापरलेले पासवर्ड मिळविण्याकडे हॅकर्सचा कल असतो.

ज्यूस जॅकिंग विरूद्धचे उपाय

  • आपला मोबाइल इतर कोणत्याही डिव्हाइससह पेअर केलेला किंवा जोडला गेलेला नाही, याची खात्री करा.
  • सार्वजनिक चार्जिंग पॉईंट्सच्या ठिकाणी चार्जिंग करताना तुमचा मोबाईल बंद करा.
  • शक्यतो चार्जिंग करण्यासाठी स्वतःजवळ पॉवर बँक ठेवा.
  • डेटा हस्तांतरित होणार नाही, यासाठी यूएसबी डेटा ब्लॉकर वापरा.

हे करू नका -

  • फोन चार्ज होत असताना पटर्न लॉक, पिन कोड, थंब लॉक आणि पासवर्ड वापरू नका.
  • सार्वजनिक यूएसबी पोर्टवरून चार्ज करण्याऐवजी AC पॉवर आउटलेट वापरा.

तज्ज्ञ काय सांगतात ( फनेंद्र बीएन, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि अ‍ॅडव्होकेट) ?

  • संवेदनशील डेटा मोबाईल फोनमध्ये ठेवू नका.
  • विनामूल्य वायफाय आणि चार्जिंग पॉईंट्स सुरक्षित असतातच असे नाही.
  • ज्यावर तुमचे नियंत्रण आहे अशाच डिव्हाइसवर संवेदनशील वैयक्तिक डेटा असू द्या.
  • ज्यूस जॅकिंगला बळी पडलो, तर काय करावे?
  • सायबर क्राइम पोलीस विभागात गुन्हा नोंदवा.
  • गरज पडल्यास तुम्हाला तुमचा फोन पोलिसांकडे जमा करावा लागू शकतो.
  • ऑनलाईन तसेच ऑफलाईनही तक्रार नोंदविली जाऊ शकते.

Last Updated : Jun 22, 2020, 2:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.