नवी दिल्ली - हाथरसप्रकरणी सरकारची प्रतिमा मलिन करून हिंसाचार घडवण्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरून षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप योगी सरकारकडून करण्यात आला होता. तेव्हा उत्तर प्रदेश पोलिसांनी पीएफआय संघटनेच्या चार सदस्यांना मथुरा शहरातून अटक केली होती. चौघेजण हाथरसकडे निघाले असताना त्यांना अटक करण्यात आली. याया चौघांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिकुर रेहमान, सिद्दीकी, मसूद अहमद आणि आलम या चौघांना पीएफआयच्या 'कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया' संघटनेशी संबंधित असल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडील मोबाईल फोन, लॅपटॉप आणि काही पुस्तके जप्त करण्यात आली. त्यांच्याकडे मिळालेल्या साहित्यामुळे शांतता आणि स्थिरता धोक्यात येण्याची शक्यता असल्याचा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला आहे. दरम्यान, या अटकेचा पीएफआय संघटनेने निषेध केला आहे.