ETV Bharat / bharat

JNU आंदोलन: मालमत्तेच्या तोडफोड प्रकरणी विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील मालमत्तेची तोडफोड आणि विद्रुपीकरण केल्याप्रकरणी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. विद्यापीठ प्रशासनाने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

कार्यालयाचे विद्रुपीकरण
author img

By

Published : Nov 17, 2019, 9:45 AM IST

नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील मालमत्तेची तोडफोड आणि विद्रुपीकरण केल्याप्रकरणी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. विद्यापीठ प्रशासनाने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तपासाअंती पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. प्रशासकीय इमारत आणि विद्यापीठ आवारातील स्वामी विवेकानंद पुतळ्याचे विद्यार्थ्यांनी नुकसान केले होते.

  • Delhi: Delhi Police has registered an FIR in connection with the "defacement of public property" at Jawaharlal Nehru University (JNU). (file pics) pic.twitter.com/3cmGwwk1hQ

    — ANI (@ANI) November 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
मागील आठवड्यात गुरुवारी रात्री ११ वाजता पोलिसांत तक्रार दाखल केल्याचे कुलगुरु एम. जगदीश कुमार यांनी सांगितले होते. तोडफोडीचे फोटो आणि व्हिडिओ पुरावे म्हणून पोलिसांकडे सादर केले होते. पुराव्यांची तपासणी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.बुधवारी(१३ नोव्हेंबर) विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीवर उजव्या गटासंबधीत संदेश लिहले होते. कुलगुरु कार्यालयाच्या दरवाजावरही विद्यार्थ्यांनी आक्षेपार्ह संदेश लिहले होते. यासोबत विद्यापीठ परिसरातील स्वामी विवेकानंद यांचा पुतळ्यावरही आक्षेपार्ह मजकूर लिहला होता. विद्यापीठाच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी आता विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.कुलगुरु भेटत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील, विद्यार्थ्यांनी पवित्राविद्यापीठ प्रशासनाच्या बैठकीत विद्यार्थ्यांना शुल्क वाढीतून सुट देण्यात आली आहे. मात्र, हा काही फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनचा सेल नाही, त्याद्वारे १० ते ५ टक्के सुट देण्यात येत आहे. प्रशासन २७ ऑक्टोबरला जाहीर केलेला निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.

Intro:Body:

JNU आंदोलन: मालमत्तेच्या तोडफोड प्रकरणी विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील मालमत्तेची तोडफोड  आणि विद्रुपीकरण केल्याप्रकरणी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. विद्यापीठ प्रशासनाने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तपासाअंती पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. प्रशासकीय इमारत आणि विद्यापीठ आवारातील स्वामी विवेकानंद पुतळ्याचे विद्यार्थ्यांनी नुकसान केले होते.

मागील आठवड्यात गुरुवारी रात्री ११ वाजता पोलिसांत तक्रार दाखल केल्याचे कुलगुरु एम. जगदीश कुमार यांनी सांगितले होते. तोडफोडीचे फोटो आणि व्हिडिओ पुरावे म्हणून पोलिसांकडे सादर केले होते. पुराव्यांची तपासणी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बुधवारी(१३ नोव्हेंबर) विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीवर उजव्या गटासंबधीत संदेश लिहले होते. कुलगुरु कार्यालयाच्या दरवाजावरही विद्यार्थ्यांनी आक्षेपार्ह संदेश लिहले होते. यासोबत विद्यापीठ परिसरातील स्वामी विवेकानंद यांचा पुतळ्यावरही आक्षेपार्ह मजकूर लिहला होता. विद्यापीठाच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी आता विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

कुलगुरु भेटत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील, विद्यार्थ्यांनी पवित्रा

विद्यापीठ प्रशासनाच्या बैठकीत विद्यार्थ्यांना शुल्क वाढीतून सुट देण्यात आली आहे. मात्र, हा काही फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनचा सेल नाही, त्याद्वारे १० ते ५ टक्के सुट देण्यात येत आहे. प्रशासन २७ ऑक्टोबरला जाहीर केलेला निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.  

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.