ETV Bharat / bharat

JKCA scam : फारुख अब्दुल्ला यांची ईडीकडून पाच तास चौकशी - जेकेसीए घोटाळा बातमी

जम्मू काश्मीर क्रिकेट असोशिएशनमध्ये(जेकेसीए) कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला असून २०१८ पासून त्यांची चौकशी सुरू आहे.

FILE PIC
फारुख अब्दुल्ला
author img

By

Published : Oct 21, 2020, 8:42 PM IST

श्रीनगर - नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची सक्तवसुली संचालनालयाने(ईडी) आज(बुधवार) पाच तास चौकशी केली. जम्मू काश्मीर क्रिकेट असोशिएशनमध्ये(जेकेसीए) कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला असून २०१८ पासून त्यांची चौकशी सुरू आहे. ८३ वर्षीय अब्दुल्ला यांची याआधी १९ ऑक्टोबरला(सोमवार) ईडीने सहा तास चौकशी केली होती.

आज पाच तास चौकशी केल्यानंतरही अब्दुल्ला शांत दिसत होते. मात्र, चौकशीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद टाळला. दरम्यान, फारुख अब्दुल्ला यांची सुडभावनेतून चौकशी करण्यात येत असल्याचे म्हणत नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने निषेध केला, तसेच या विरोधात प्रस्ताव मंजुर केला.

गुपकर जाहीरनाम्यानंतर चौकशीचा ससेमिरा

१९ ऑक्टोबरला चौकशी केल्यानंतर मी चिंतेत नसून तपासात सहकार्य करत असल्याचे अब्दुल्ला म्हणाले होते. काश्मीरची स्वायत्तता पुन्हा मिळविण्यासाठी काश्मीरातील सर्व पक्षांनी मिळून गुपकर जाहीरनामा पुढे नेण्याचा निर्धार केला नुकताच केला आहे. त्यानंतर अवघ्या चार दिवसांनी ईडीने त्यांची चौकशी केली. मनी लॉड्रींग कायद्यानुसार अब्दुल्ला यांचा जबाब नोंदविण्यात येत आहे. अब्दुल्ला यांची मागील वर्षी चंदीगडमध्ये पहिल्यांदा ईडीने चौकशी केली होती. जेकेसीएचे अध्यक्ष असताना अब्दुल्ला आणि घेतलेले निर्णय आणि कथित गैरव्यवहारांची ईडीकडून चौकशी सुरू आहे.

अब्दुल्ला यांच्या विरोधात सर्वात प्रथम केंद्रीय अन्वेषण विभागाने(सीबीआय) गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ईडीने या आरोपांची दखल घेत गुन्हा दाखल केला. सीबीआयने जेकेसीएच्या माजी अधिकाऱ्यांना आरोपी बनविले आहे. यामध्ये महासचिव मोहम्मद सलीम खान आणि माजी खजिनदार अहसान अहमद मिर्जा यांचा समावेश आहे. सीबीआयने २०१८ साली सुमारे ४३ कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २००२ ते २०११ या काळात काश्मीर क्रिकेटचा विकास करण्यासाठी ही रक्कम दिली होती. मात्र, त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.