अवंतीपोरा - जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांच्या दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत आज दोन दहशतवादी ठार झाले. लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने एकत्रितरीत्या ही मोहीम राबवली. मोहिमेची सुरुवात सोमवारी सायंकाळी झाली होती.
यापैकी एक दहशतवादी जैश-ए-मोहम्मद आणि दुसरा लश्कर-ए-तैयबा दहशतवादी संघटनांशी संबंधित होता. लश्करच्या दहशतवाद्याचे नाव उफैद फारूख लोन असे होते. तर जैशच्या दहशतवाद्याची अद्याप ओळख पटलेली नाही.
-
#UPDATE Jammu and Kashmir: Another terrorist has been gunned down in an encounter with security forces in Awantipur, he was affiliated with terror outfit Jaish e Mohammad. https://t.co/Nolgpy5rE6
— ANI (@ANI) October 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#UPDATE Jammu and Kashmir: Another terrorist has been gunned down in an encounter with security forces in Awantipur, he was affiliated with terror outfit Jaish e Mohammad. https://t.co/Nolgpy5rE6
— ANI (@ANI) October 8, 2019#UPDATE Jammu and Kashmir: Another terrorist has been gunned down in an encounter with security forces in Awantipur, he was affiliated with terror outfit Jaish e Mohammad. https://t.co/Nolgpy5rE6
— ANI (@ANI) October 8, 2019
५ ऑक्टोबरला दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग येथील उपायुक्त कार्यालयावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यामागे उफैदचा हात होता. या हल्ल्यात १४ जण गंभीर जखमी झाले होते. याशिवाय काश्मीर खोऱ्यातील दुकानदार, फळ विक्रेते, पेट्रोलपंप चालकांना धमकावणे, मारहाण करणे आदींमध्येही त्याचा सहभाग होता.
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्यात आल्यापासून पाकिस्तान आणि पाकस्थित दहशवतादी संघटना अधिकच बिथरल्या आहेत. काश्मीर खोरे अशांत ठेवण्यासाठी त्यांच्याकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
२८ सप्टेंबरपासून सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या ४ शोधमोहिमा यशस्वीरीत्या राबवल्या आहेत. बटोट, रामबन जिल्ह्यात या मोहिमा राबवण्यात आल्या. येथे हिज्बुल मुजाहिदीनच्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यांनतर दुसऱ्याच दिवशी गांदेरबल येथील कंगन येथे घुसखोरी केलेल्या जैशच्या २ दहशतवाद्यांनाही यमसदनी धाडण्यात आले होते.