ETV Bharat / bharat

आजपासून जम्मू-काश्मीर, लडाख केंद्रशासित प्रदेश - जम्मू-काश्मीर

गुजरातचे माजी शासकीय अधिकारी गिरीश चंद्र मुर्मू हे जम्मू-काश्मीरचे आणि माजी आयएएस अधिकारी आर. के. माथूर हे लडाखचे नायब राज्यपाल (लेफ्टनंट गव्हर्नर) बनणार आहेत. आज (गुरुवार) या दोघांचा शपथविधी होणार आहे. जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश गीता मित्तल त्यांना शपथ देतील.

केंद्रशासित प्रदेश
author img

By

Published : Oct 31, 2019, 8:19 AM IST

Updated : Oct 31, 2019, 10:14 AM IST

श्रीनगर : जम्मू-काश्मीर गुरुवारी (३१ ऑक्टोबरच्या) मध्यरात्रीपासून राज्य राहणार नसून त्याचे जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन झाले आहे. संसदेत ५ ऑगस्टला जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल ३७० रद्द करण्यात आले होते. याच वेळी जम्मू-काश्मीरचे विभाजन करून जम्मू-काश्मीर आणि लडाख असे विभाजन करण्याचे विधेयकही संमत झाले होते. यानंतर जम्मू-काश्मीरचे अधिकृतरित्या दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन झाले.

गुजरातचे माजी शासकीय अधिकारी गिरीश चंद्र मुर्मू हे जम्मू-काश्मीरचे आणि माजी आयएएस अधिकारी आर. के. माथूर हे लडाखचे नायब राज्यपाल (लेफ्टनंट गव्हर्नर) बनणार आहेत. आज (गुरुवार) या दोघांचा शपथविधी होणार आहे. जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश गीता मित्तल त्यांना शपथ देतील.

हेही वाचा - 'राम मंदिराच्या निकालानंतर काही शक्ती धर्माच्या नावार तेढ निर्माण करतील'

कायद्यानुसार, जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशाला पदुच्चेरीप्रमाणे विधीमंडळ राहणार आहे. तर, लडाख हा चंडीगडप्रमाणे विधिमंडळाशिवायचा केंद्रशासित प्रदेश असेल. या दोन्हींचे प्रमुख दोन वेगवेगळे नायब राज्यपाल असतील. जम्मू-काश्मीरमध्ये आता पोलीस व कायदा-सुव्यवस्था यांवर केंद्र सरकारचे थेट नियंत्रण राहील. तर, तेथील जमिनीबाबतचे अधिकार तेथे निवडणुकीद्वारे येणाऱ्या सरकारला असतील.

Intro:Body:

३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून जम्मू-काश्मीर, लडाख केंद्रशासित प्रदेश

श्रीनगर - जम्मू-काश्मीर गुरुवारी (३१ ऑक्टोबरच्या) मध्यरात्रीपासून राज्य राहणार नसून त्याचे जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन झाले आहे. संसदेत ५ ऑगस्टला जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल ३७० रद्द करण्यात आले होते. याच वेळी जम्मू-काश्मीरचे विभाजन करून जम्मू-काश्मीर आणि लडाख असे विभाजन करण्याचे विधेयकही संमत झाले होते. यानंतर जम्मू-काश्मीरचे अधिकृतरीत्या दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन झाले.

गुजरातचे माजी शासकीय अधिकारी गिरीश चंद्र मुर्मू जम्मू-काश्मीरचे आणि माजी आयएएस अधिकारी आर. के. माथुर लडाखचे नायब राज्यपाल (लेफ्टनंट गव्हर्नर) बनणार आहेत. आज (गुरुवार) या दोघांचा शपथविधी होणार आहे. जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश गीता मित्तल त्यांना शपथ देतील.

कायद्यानुसार, जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशाला पुदुच्चेरीप्रमाणे विधिमंडळ राहणार आहे. तर, लडाख हा चंडीगडप्रमाणे विधिमंडळाशिवायचा केंद्रशासित प्रदेश असेल. या दोन्हींचे प्रमुख दोन वेगवेगळे नायब राज्यपाल असतील. जम्मू-काश्मीरमध्ये आता पोलीस व कायदा-सुव्यवस्था यांवर केंद्र सरकारचे थेट नियंत्रण राहील. तर, तेथील जमिनीबाबतचे अधिकार तेथे निवडणुकीद्वारे येणाऱ्या सरकारला असतील.

Conclusion:
Last Updated : Oct 31, 2019, 10:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.