श्रीनगर - जम्मू-काश्मीर सरकारने अब्दुल गनी मीर यांची अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी (कायदा व सुव्यवस्था) नियुक्ती केली आहे. बुधवारी रात्री उशिरा यासंबंधित आदेश केंद्र शासित प्रदेशाचा गृह विभागाकडून जारी करण्यात आला.
अब्दुल गनी मीर पोलीस महासंचालकपदासह पोलीस मुख्यालयाची जबाबदारीही स्वीकारतील, असेही आदेशात म्हटले आहे. एडीजीपी कायदा व सुव्यवस्थेचे काम यापूर्वी यापूर्वी मुनीर अहमद खान यांच्याकडे होते. 30 जून रोजी ते निवृत्त झाले परंतु, सेवानिवृत्तीपूर्वी त्यांना या केंद्र शासित प्रदेश मागासवर्गीय आयोगाचे सदस्य म्हणून उमेदवारी देण्यात आली.
जम्मू-कश्मीर सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती (निवृत्त) जी. डी. शर्मा आहेत. भारतीय परराष्ट्र सेवेचे माजी अधिकारी लाल भारती आणि मुनीर अहमद खान हे आयोगाचे सदस्य आहेत.