ETV Bharat / bharat

Article 370 : राहुल या मुद्द्याचे राजकारण करताहेत, त्यांना बोलावताना अटी घातल्या नव्हत्या - मलिक

author img

By

Published : Aug 14, 2019, 9:24 AM IST

राहुल गांधींनी त्यांना आणि त्यांच्या शिष्टमंडळाला राज्यपालांचे आमंत्रण मान्य असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यांनी लोकांना भेटण्यासाठी प्रवास करण्यास, सध्या नजरकैदेत असलेल्या नेत्यांना आणि लष्करातील भेटण्याची परवानगी मागितली होती.

सत्यपाल मलिक

जम्मू-काश्मीर - राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जम्मू-काश्मीरला येण्याचे आमंत्रण दिल्याच्या मुद्द्याचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. राहुल गांधींनी शनिवारी जम्मू-काश्मीरमध्ये हिंसा घडत असल्याचे वक्तव्य केले होते. यानंतर मलिक यांनी 'राहुलजी स्वतः येथे येऊन पहा, मी तुम्हाला खास विमान देतो,' असे म्हटले होते. राहुल या आमंत्रणाचे राजकारण करत असून ते विरोधकांचे शिष्टमंडळ येथे आणू पहात आहेत, असा आरोप मलिक यांनी केला.

मलिक यांनी काश्मीरला येण्याचे आमंत्रण दिल्यानंतर राहुल गांधींनी 'आपल्याला विमान नको असून लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळावी,' असे म्हटले होते. यानंतर राजभवनातून जारी झालेल्या निवेदनात 'राज्यपालांनी राहुल गांधींना बोलावताना त्यांच्या इतक्या सगळ्या अटी मान्य करण्याचा निर्णय घेतला नव्हता. राहुल गांधी आपण दिलेल्या आमंत्रणाचे राजकारण करत असून येथे सामान्य लोकांमध्ये अशांतता पसरवण्यासाठी ते विरोधकांचे शिष्टमंडळ आणू पहात आहेत. ' असे म्हटले आहे.

राहुल गांधी या मुद्द्याचे राजकारण करत आहेत. त्यांनी जम्मू-काश्मीरला भेट देण्यासाठी त्यांनी अनेक अटी ठेवल्या आहेत. यामध्ये सध्या नजरकैदेत असलेल्या मुख्य प्रवाहातील नेत्यांना भेटण्याचीही अट समाविष्ट आहे. राज्यपालांनी त्यांना इतक्या सगळ्या अटींसह बोलावले नव्हते. त्यामुळे राहुल गांधींच्या विनंतीचा विचार करण्यासाठी त्यांनी हे प्रकरण स्थानिक पोलिसांकडे आणि प्रशासनाकडे सोपवले आहे,' असे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.

'राहुल गांधी येथील सीमेवर पसरलेल्या खोट्या बातम्यांच्या आधारे बोलत आहेत. प्रत्यक्षात काही लहान-सहान घटना वगळता काश्मीरमध्ये शांतता आहे. राहुल विविध भारतीय माध्यमांमधून स्वतः याविषयी माहिती घेऊ शकतात ज्यांनी काश्मीरमधील वातावरणावर बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. तसेच, सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेले तपशीलही घ्यावेत. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण पूर्णपणे सरकारवर सोपवले आहे,' असेही या निवेदनात म्हटले आहे.

राहुल गांधींनी त्यांना आणि त्यांच्या शिष्टमंडळाला राज्यपालांचे आमंत्रण मान्य असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यांनी लोकांना भेटण्यासाठी प्रवास करण्यास, सध्या नजरकैदेत असलेल्या नेत्यांना आणि लष्करातील भेटण्याची परवानगी मागितली होती. तसेच, त्यांनी जम्मू-काश्मीरमधून हिंसेच्या बातम्या ऐकायला मिळत असल्याचेही म्हटले होते.

Intro:Body:

-------------

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.