ETV Bharat / bharat

काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात दोन 'मोस्ट वाँटेड' दहशतवाद्यांवर १५ लाखांचे बक्षिस - मोस्ट वांटेड दहशतवादी

जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात पोलिसांनी २ कुख्यात दहशतवाद्यांवर १५ लाख रुपये बक्षीस ठेवले आहे. जी व्यक्ती या दोघांबद्दल माहिती देईल त्याला बक्षिस देण्यात येणार आहे.

मोस्ट वाँटेड
author img

By

Published : Oct 23, 2019, 10:51 AM IST

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात पोलिसांनी २ कुख्यात दहशतवाद्यांवर १५ लाख रुपये बक्षिस ठेवले आहे. जी व्यक्ती या दोघांबद्दल माहिती देईल त्याला बक्षिस देण्यात येणार आहे. माहिती देणाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे पोस्टरवर लिहले आहे.

  • Jammu and Kashmir: Doda district police has put up posters announcing cash reward of Rs 15 lakhs on information leading to arrest of two most-wanted terrorists. pic.twitter.com/AtcqqE9HMB

    — ANI (@ANI) October 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शहरातील स्टेट बँक मुख्यालय आणि आयसीआयसी बँकेबाहेर पोलिसांनी पोस्टर लावले आहेत. हारुन अब्बास वाणी आणि मसूद अहमद अशी दोघांची नावे आहेत. हारुन वाणी हा घाट या गावातील राहणारा असून त्याने एमबीएचे शिक्षण घेतले आहे. सप्टेंबर २०१८ पासून तो दहशतवादी संघटनेत सहभागी झाला. तर मसूद हा मंजमी गावचा रहिवासी असून यावर्षी तो दहशतवादी संघटनेत सहभागी झाला.

दोन कुख्यात दहशतवादी पकडण्यासाठी पोलिसांनी अभियान हाती घेतले आहे. त्यांना जिवंत पकडण्यासाठी किवा ठार मारण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. पहिल्यांदाच या दोघांवर इनाम जाहीर करण्यात आले आहे.

२०११ साली डोडा जिल्हा दहशतवाद मुक्त करण्यात आला. मात्र, मागील वर्षी हारुन वाणी याने दहशतवादी संघटनेत सहभाग घेतल्याने जिल्ह्यात दहशतवादाने डोके वर काढले आहे. हारुन आणि त्याचे साथीदार तरुणांना दहशतवादी गटामध्ये सहभागी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Intro:Body:

national news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.