रांची - झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी आज (शुक्रवारी) पाचव्या म्हणजेच शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले. पाचव्या टप्प्यामध्ये ७०.८३ टक्के मतदान झाले. सहा जिल्ह्यांमधील १६ विधानसभा मतदारसंघांमध्ये सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली होती. राज्यामध्ये २३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
सकाळी अकरा वाजेपर्यंत २९.१९ टक्के मतदानाची नोंद झाली होती. तर दुपारी एक वाजेपर्यंत ४६.५० टक्के मतदानाची नोंद झाली होती. शेवटच्या टप्प्यामध्ये सर्वाधिक मतदान झाले.
मतदानावेळी बोरेया मतदारसंघातील बूथ क्रमांक १४९ वर एका वृद्धाचा मृत्यू झाला. ६५ वर्षांच्या सरयू साह यांनी मतदान केल्यानंतर आपले प्राण सोडल्याची घटना घडली.
एकून पाच टप्प्यात पार पडले मतदान
पहिल्या टप्प्यामध्ये १३ जागांसाठी ६२.८७ टक्के मतदान झाले.
दुसऱ्या टप्प्यामध्ये ६२.४० टक्के मतदान झाले.
तिसऱ्या टप्प्यामध्ये ६१.९३ टक्के मतदान झाले.
चौथ्या टप्प्यामध्ये ६२.४६ टक्के मतदान झाले.
पाचव्या टप्प्यामध्ये ७०.८३ टक्के मतदान झाले.
राज्यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम), काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल या तीन पक्षांनी निवडणूकपूर्व युती जाहीर केली आहे. त्यानुसार काँग्रेस ३१, राजद ७, तर जेएमएम सर्वात जास्त ४३ जागा लढवल्या. या युतीकडून मुख्यमंत्रिपदासाठी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे नाव पुढे केले जात आहे. झारखंडमध्ये सध्या मुख्यमंत्री रघुबर दास यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार आहे. २३ डिसेंबरला या टप्प्याची मतमोजणी होणार आहे.
हेही वाचा : भगवी वस्त्रे घातलेले अविवाहित पुरुष हे बलात्कारी; झारखंडमधील नेत्याचे धक्कादायक वक्तव्य!